
lalit modi citizenship : ललित मोदीने वानुआतु देशाचं नागरिकत्व मिळवलं होतं. मात्र आता त्याला मोठा झटका बसला आहे. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापत यांनी सोमवारी नागरिकत्व आयोगाला यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदीसाठी मोठं संकट उभं राहिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वानुआतु सरकारने त्यांना दिलेलं पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न करणारे ललित मोदी यांच्याकडे या देशाचं नागरिकत्व मिळण्याची वैध कारणं नाहीत, असं वानुआतु सरकारचं म्हणणं आहे. ललित मोदींवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून भारतातून वॉन्टेंड आहे. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापत यांनी देशाच्या नागरिकत्व आयोगाला ललित मोदीला दिलेला पासपोर्ट रद्द करण्यास सांगितलं आहे.
नक्की वाचा - पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय?
भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याचं आवाहन...
ललित मोदीला भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याची सूचना देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले, त्यांना लंडनमधील भारतीय उच्चायोगमध्ये आपला पासपोर्ट सरेंडर करण्यास सांगितले आहे. सध्याच्या नियम आणि कार्यपद्धतींच्या आधारे याची चौकशी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी वानुआतुचे नागरिकत्त्व मिळवून दिली आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार खटला चालवत आहोत. ललित मोदी 2010 मध्ये भारत सोडून गेला होता. आयपीएलमध्ये आपल्या कार्यकाळादरम्यान कोट्यवधींच्या घोटाळ्यात सामील असल्याच्या आरोपाखाली ललित मोदी भारतात वॉन्टेड आहे.
वानुआतु देश कुठे आहे?
वानुआतु देश दक्षिण प्रशांत महासागरात स्थित आहे. येथील अर्थव्यवस्था विशेषत: शेती, पर्यटन, मासेमारी आणि परदेशी वित्तीय सेवांवर आधारित आहे. वानुआतुमध्ये गुंतवणूक आधारित नागरिकत्व आहे. म्हणजे पैसे देऊन तुम्ही येथील नागरित्व मिळवू शकता. पासपोर्टची विक्री येथील सरकारचं प्रमुख उत्पन्न आहे. एका अहवालानुसार, 2025 पर्यंत वानुआतुचाचा पासपोर्च 113 देशांमध्ये व्हिजा शिवाय परवानगी देतो. हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार, वानुआतुचा पासपोर्ट जगातील 51 व्या क्रमांकावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world