कमी बजेट, मोठे स्वप्न! महिलेने दररोज फक्त 2 हजार रुपये खर्च करून फिरले 15 देश

तिने एका वर्षात 15 देशांची यात्रा केली. त्यात तिने दररोज फक्त 2000 रुपये खर्च केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

एका महिलेने हे सिद्ध करून दाखवले आहे की इच्छाशक्ती असली तर  कमी पैशांमध्येही जग फिरता येते. लिडिया स्विंसको (Lydia Swinscoe) एक फ्रीलांस ट्रॅव्हल रायटर आहे. जिने आपली नोकरी सोडली आणि फक्त 7000 पाउंड्स जवळपास 7.8 लाख रुपये घेऊन जगाची सफर सुरू केली. तिने एका वर्षात 15 देशांची यात्रा केली. त्यात तिने दररोज फक्त 2000 रुपये खर्च केले. योग्य योजना आणि विचारपूर्वक खर्च केल्यास कोणीही कमी पैशात प्रवास करू शकतो असं लिडियाचा म्हणणं आहे. तिने तिच्या अनुभवावरून 5 सोपे मार्ग सांगितले आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्हीही कमी बजेटमध्ये फिरू शकता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्वस्त ठिकाणी राहा
महागड्या हॉटेल्सऐवजी डॉर्मिटरीमध्ये राहिल्याने बरेच पैसे वाचतात. ही जागा फक्त स्वस्तच नसते, तर येथे जगभरातून आलेल्या लोकांशी मैत्रीही होते. अनेक वेळा तर यात नाश्ता देखील मोफत मिळतो.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sharad Pawar : "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये", शरद पवारांचं मोठं वक्तव्य

आपल्या योजनेत लवचिकता ठेवा
जर तुम्ही ठरलेल्या वेळेत आणि तारखांमध्ये अडकले असाल, तर जास्त पैसे खर्च करावे लागतील. लिडियाने सांगितले की लवचिक योजना बनवून तुम्ही ऑफ सिझनमध्ये कमी दरात प्रवास करू शकता. त्यात जास्त वेळ स्वस्त शहरांमध्ये घालवू शकता. भारतासारख्या देशात सण आणि धार्मिक स्थळांची यात्रा जवळपास मोफत असते, असं ही तिने सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा? आकडा आला समोर

बाहेरचे खाण्याऐवजी स्वतः बनवून खा
लिडियाने सांगितले की स्थानिक बाजारातून फळे आणि भाज्या खरेदी करून स्वतः जेवण बनवणे केवळ स्वस्तच नसते, तर हा एक नवीन अनुभव देखील असतो. तिने बोलिव्हियातील मोठ्या एव्होकॅडो आणि बँकॉकच्या स्ट्रीट फूडचा उल्लेख केला. ते स्वस्त आणि चविष्ट दोन्ही होते असं ती आवर्जून सांगते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही", केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

स्वस्त प्रवासाचे पर्याय निवडा
लांबचा प्रवास करण्यासाठी बस, ट्रेन किंवा बोट यांसारख्या स्वस्त साधनांचा वापर करा. लिडिया चालण्याचा सल्ला देखील देते. कारण याने तुम्ही शहराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. त्यात पैसेही वाचतात. तिने रात्रीच्या बस आणि ट्रेनचाही उल्लेख केला आहे. ज्यामुळे राहण्याचा खर्च वाचतो आणि प्रवासही होतो.

ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?

स्थानिक लोकांशी संवाद साधा
नवीन ठिकाणे समजून घेण्यासाठी तेथील लोकांशी बोला. लिडियाने सल्ला दिला की लोकल टूरवर जास्त भर द्या. ज्यात गाइड तुम्हाला त्या ठिकाणाबद्दलची खास माहिती देतात. तसेच, जर तुम्ही तेथील लोकांशी मैत्री केली, तर तुम्हाला स्वस्त होमस्टे, स्थानिक जेवण आणि बरीच माहिती मोफत मिळू शकते.