
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानात 100 किमी आत घुसून भारताने दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांची एकूण 21 अड्डे लष्कराने उद्ध्वस्त केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑपरेशन सिंदूरमध्ये आतापर्यंत 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची मोजणी अजूनही सुरुच आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे अचूक संख्या सांगणे कठीण आहे. पाकिस्तानकडून जोपर्यंत कोणतीही कुरघोडी होत नाही तोपर्यंत भारताकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
The government has stated that over 100 terrorists were killed in #OperationSindoor, and the count is still ongoing. The government also mentioned that Operation Sindoor is still underway, making it difficult to provide an exact number. Additionally, the government said that… pic.twitter.com/q1kme1vT68
— ANI (@ANI) May 8, 2025
(नक्की वाचा - Operation Sindoor: 'सुसाईड ड्रोन'ने उडवली पाकिस्तानची झोप! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापर)
25 मिनिटात दहशतवाद्यांची 21 ठिकाणं उद्ध्वस्त
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 6-7 मे च्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तान आणि पीओके दोन्हीमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले झाले. यावेळी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.
(नक्की वाचा- पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे?)
भारताने हल्ला केलेली दहशतवादी ठिकाणे
- बहावलपूर- आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे.
- मुरीदके – सीमेलगत, सांबासमोर सुमारे 30 किमीवर लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा तळ आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणहून ट्रेनिंग घेऊन आले होते.
- गुलपूर – नियंत्रणरेषेपासून (LoC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथे आहेत.
- सवाई LeT कॅम्प – PoJK मधील टंगधार सेक्टरमध्ये, 30 किमी आत आहे. सोनमर्गमध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्गमध्ये 24 ऑक्टोबर 2024, पहलगामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यांचा संबंधांमुळे इथे हल्ला करण्यात आला.
- बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे.
- कोटली LeT कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 15 किमी आत, राजौरी समोर आहे. LeT चा आत्मघातकी तळ असून सुमारे 50 दहशतवाद्यांची क्षमता आहे.
- बर्नाळा कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 10 किमी आत राजौरी समोर आहे.
- सरजल कॅम्प – JeM चा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी आत सांबा-कठुआ समोर हा कॅम्प आहे.
- महमूना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत, सियालकोटजवळ हे ठिकाण आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world