
रेवती हिंगवे, पुणे
Sharad Pawar Big Statement : अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं. याला जोडून आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक बोलताना म्हटलं की, उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये. राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांनी बसून चर्चा करावी. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Priti Band : विधानसभेनंतर ठाकरे गटातून बडतर्फ; प्रीती बंड शिंदे गटात करणार प्रवेश)
दुरावलेली कुटुंबे एकत्र यावीत- भुजबळ
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी म्हटलं की, मी मागेही म्हटलं होतं की दुरावलेली कुटुंबे एकत्र यावीत. ही आनंदाची गोष्ट आहे. राजकीय शक्तीही वाढेल. लवकरच मनोमिलन व्हावे. मागे कारणे वेगळी असू शकतात. पुढाकार घ्यावा असे वाटत असेल तर मी पुढाकार घेईन. पण मध्यस्थीची गरज लागणार नाही, असंही भुजबळ म्हणाले.
नक्की वाचा - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?
शरद पवारांनी मुलाखतीत काय म्हटलं?
याआधी एका मुलाखतीत शरद पवारांना पक्षाच्या भविष्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, सध्या पक्षात अजित पवारांसोबत जाण्याबाबत दोन मतप्रवाह आहे. एक गट अजित पवारांसोबत जाण्याबाबत सकारात्मक आहे, तर दुसरा गट कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जोडला जाऊ इच्छित नाही. त्याऐवजी ते इंडिया आघाडीसोबत राहण्यास तयार आहे. सध्या INDIA आघाडी फार सक्रिय नाही. त्यामुळे सध्या स्वत:च्या पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि अधिकाधिक तरुणांचा समावेश करून घेणं आवश्यक आहे. सुप्रियाला स्वत:ला निर्णय घ्यावा लागेल. संसदेत विरोधात बसायचं की नाही हा निर्णय सुप्रियाला घ्यावा लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world