जाहिरात

MRI Machine : एक चूक जीवावर बेतली; पत्नीच्या उपचारासाठी आलेल्या व्यक्तीचा MRI मध्ये अडकल्याने मृत्यू

Man and MRI Machine Viral : एमआरआय कक्षात गळ्यात, हातात किंवा शरीरावर कुठेही धातूच्या वस्तू घालण्यास मनाई केली जाते.

MRI Machine : एक चूक जीवावर बेतली; पत्नीच्या उपचारासाठी आलेल्या व्यक्तीचा MRI मध्ये अडकल्याने मृत्यू

Man gets sucked into MRI machine : वैद्यकीय उपकरणं आजूबाजूला असताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एक छोटासा निष्काळजीपणा तुमचा जीव घेऊ शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक 61 वर्षीय व्यक्ती कीथ मॅकअॅलिस्टर या अपघातात मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॅनदरम्यान या व्यक्तीने गळ्यात मेटलची चैन घातली होती. एमआरआय कक्षात गळ्यात, हातात किंवा शरीरावर कुठेही धातूच्या वस्तू घालण्यास मनाई केली जाते. कारण एमआरआय मशीनच्या आतील चुंबक व्यक्तीच्या शरीरावरील धातू खेचून घेतो. अशावेळी त्या वस्तूसह व्यक्तीही स्कॅनरच्या दिशेने खेचला जाऊ शकतो. 

घटनेचा तपास सुरू...(Man gets sucked into MRI machine)

Nimisha Priya: कोणत्या कारणामुळे टळली निमिषाची फाशी? शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा Inside Story

नक्की वाचा - Nimisha Priya: कोणत्या कारणामुळे टळली निमिषाची फाशी? शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा Inside Story

ही घटना बुधवारी सायंकाळी साधारण 4.30 वाजेदरम्यान घडली. हा प्रकार न्यूयॉर्कच्या लॉन्ग आयलँड स्थित एका रुग्णालयात घडला. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काही वृत्त संस्थांकडून देण्यात आली आहे. ((Man and MRI Machine Viral Video))

मिळालेल्या माहितीनुसार, कीथ मॅकअॅलिस्टर यांची पत्नी गुडघ्याचा एमआरआय करण्यासाठी गेली होती.  प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिने एका तंत्रज्ञाला पतीला आत पाठविण्यास सांगितलं. तिला टेबलावरुन खाली उतरविण्यास मदत करेल हा हेतू होता. कीथ मॅकअॅलिस्टर जेव्हा रुममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या गळ्या 20 पाऊंड वजनाची चैन होती. तो खोलीत येताच एमआरआय मशीनच्या दिशेने खेचला गेला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com