Expensive Divorce of Century : दक्षिण कोरियाचे उद्योगपती आणि SK Group चे चेयरमन चेय ताए-वोन यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोल उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम कमी केली असली तरी, त्याला त्याची एक्स पत्नी रो सोह-योंग हिला अंदाजे ९४४ अब्ज वॉन (अंदाजे ९४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) किंवा भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी (८२ अब्ज वॉन) द्यावे लागतील. अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही. दोन्ही पक्षांपैकी कोणाचीही इच्छा असल्यास ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
- सोल उच्च न्यायालयाने घटस्फोटाची रक्कम कमी करून ९४४ अरब वॉन केली आहे.
- ही रक्कम भारतीय रुपयात तब्बल ८,२०० कोटींच्या घरात आहे.
- यापूर्वी २०२४ मध्ये न्यायालयाने १.३८ ट्रिलियन वॉन देण्याचे आदेश दिले होते.
- ही हाय प्रोफाइल केस बऱ्याच काळापासून शतकातील घटस्फोट नावाचे चर्चेत आहे.
- न्यायालयाच्या या केसविरोधात अद्यापही सर्वोच्च न्यायालयात अपील केली जाऊ शकते.
नक्की वाचा - समुद्रात 700 मीटर खाली सोन्याचा प्रचंड साठा; जगातील सर्वात मोठा खजिना सापडला?
न्यायालयाने काय म्हटलं?
- न्यायालयाने सांगितलं की, लग्नादरम्यान चेय ताए-वोनची व्यावसायिक भागीदारी आणि संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे त्यांची एक्स पत्नी रो सोह-योंग कुटुंब, मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करीत आहे. याच्या आधारावर उद्योगपतीला त्याच्या संपत्तीचा एक मोठा भाग पत्नीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
- हे प्रकरण इतकं चर्चेत का आहे?
- चेय ताए-वोन दक्षिण कोरियातील एक मोठे उद्योगपती आणि SK Group चे चेयरमन आहे.
- त्यांची कंपनी SK Hynix ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये वाढत्या मागणीमुळे फायदा झाला आहे.
- त्यांची एकूण भागीदारी तब्बल ५.५ बिलियन डॉलरच्या घरात आहे.
- यांचं लग्न १९८८ मध्ये झालं होतं आणि त्यांना तीन मुलंही आहेत.
- २०१७ मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर हा कायदेशीर वाद न्यायालयात सुरू आहे.
Topics mentioned in this article