Nostradamus : 2026 विनाशकारी वर्ष...? तिसरं युद्ध ते आर्थिक संकट; 500 वर्षांपूर्वी केलेली भयंकर भविष्यवाणी

Nostradamus 2026 Predictions: नॉस्त्रेदमस हा १६ व्या शतकातील एक फ्रेंच ज्योतिषी आहेत. या प्रसिद्ध भविष्यवक्त्याची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nostradamus 2026 Predictions: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 2025 वर्षात अनेक लक्षणीय घडामोडी घडल्या. पण 2026 वर्ष भारतासाठी आणि जगासाठी कसं असेल याचीही सर्वांनाच उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवक्ता नॉस्त्रेदमस याच्या काही भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. नॉस्त्रेदमस याने 500 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नॉस्त्रेदमस याने आपल्या रहस्यमयी कवितांमधून तिसऱ्या विश्वयुद्धाची आणि मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती. यामुळे नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 
 
नॉस्त्रेदमस याच्या 2026 च्या भविष्यवाणीनुसार, 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे 2026 वर्ष जगासाठी घातक ठरू शकतं. धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांची हत्या करतील, असं नॉस्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये सांगितलंय. नॉस्त्रेदमस याने युद्ध, आर्थिक संकट, नैसर्गिक संकट अशा अनेक बाबतीच भविष्यवाणी केली आहे. 

समुद्री युद्धाचं संकट

2026 मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या दरीत ढकलू शकते. एखाद्या देशाच्या चुकीच्या वर्तनामुळे समुद्री सीमांवर तणाव वाढेल आणि तणावामुळे मोठी राष्ट्र एकमेकांसमोर युद्धासाठी उभी राहतील. 

आर्थिक संकट 

नॉस्त्रेदमसने आपल्या पुढच्या भविष्यवाणीत जगावरील आर्थिक संकटाबाबत लिहलंय. ज्यानुसार आर्थिक महासत्ता अमेरिका, युनायटेड किंग्डम असे देश आर्थिक संकटात अडकतील. ज्यामुळे जगभरातील देशांवर महागाईचं संकट कोसळेल. अनेक देशांमध्ये महागाईमुळे अशांतीचं वातावरण निर्माण होईल. याशिवाय जगातील बड्या नेत्यांचा अस्त होईल असं भविष्यवाणीत लिहलं आहे. 

नैसर्गिक संकट 

नॉस्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये नैसर्गिक संकटांचाही उल्लेख केला आहे. 2026 मध्ये भीषण उकाड्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडेल. त्यानंतर अचानक आलेल्या भयंकर पावसामुळे ठिकठिकाणी महापूर येईल. 2026 या वर्षाचा विनाशकारी वर्ष म्हणून उल्लेख केला आहे. ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.

Advertisement

नक्की वाचा - Epstein Files :जग हादरलं! स्विमिंग पुलमध्ये मुलींसोबत अंघोळ करतानाचे फोटो; एपस्टिन फाइल्समधून मोठी माहिती समोर

AI चा प्रभाव 

नॉस्त्रेदमस याच्या भविष्यवाणीत AI चाही उल्लेख करण्यात आलाय. यानुसार 2026 वर्षात एआयचा प्रभाव अधिक वाढणार असून आर्टिफिशियल इंटेलिजंस फक्त कमांडनुसार चालणार नाही. तर एआय प्रणाली स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती मिळवू शकेल. हळूहळू लोकांना एआयचं नियंत्रण आपल्या हातात राहिलं नाही याची जाणीव होईल.

Advertisement

नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जगावर परमाणू हल्ल्याचंही संकट घोंघावतंय. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नॉस्त्रेदमसची ही भविष्यवाणी खरी ठरते की काय अशी भीती वाटते आहे. पण ज्या नॉस्त्रेदमसची भविष्यवाणी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलीय, तो नॉस्त्रेदमस नेमका आहे तरी कोण हे जाणून घेऊया.  

नॉस्त्रेदमस कोण आहे?

नॉस्त्रेदमस हा १६ व्या शतकातील एक फ्रेंच ज्योतिषी आहेत. त्यांचा जन्म १५०३ मध्ये फ्रान्समध्ये झाला. त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि प्लेगच्या काळात डॉक्टर म्हणून काम केलं. त्यांनी ज्योतिष आणि गूढ विद्येचा अभ्यास केला होता. नॉस्त्रेदमस  यांनी 'लेस प्रोफेसीज'या पुस्तकात चार ओळींच्या कविता लिहिल्या आहेत. या कवितांमधून राजकीय, नैसर्गिक आणि इतर संकटांचं भाकित वर्तवलं गेलं. फ्रान्सची राणी कॅथरीन डी मेडिसी यांच्या दरबारात त्यांना स्थान मिळालं होतं. त्यांच्या काही भाकितांचा संबंध फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियन आणि हिटलर यांच्या उदयाशी जोडला जातो.
 
अशा या प्रसिद्ध भविष्यवक्त्याची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. आजही अनेक लोक नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. जरी अनेक अभ्यासक त्यांच्या भाकितांना अलौकिक शक्ती मानत नसले. तरीही त्यांचं गूढ लेखन जगभरातील लोकांना आकर्षित करतं. आता नॉस्त्रेदमसची भविष्यवाणी नव्या वर्षात कितपत खरी ठरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय..

Advertisement