epstein files release : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं एपस्टिन फाइल्समध्ये दुसऱ्या टप्प्यातील फोटोसह इतर गोष्टी समोर आल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून जगाला हादरवणाऱ्या एपस्टिन फाइल्समधील दुसऱ्या टप्प्यातील साहित्य समोर आले असून यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
यात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता ख्रिस टकर तसंच ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचे फोटो समोर आले आहे. या फोटोंमध्ये बिल क्लिंटन मुलींसोबत पुलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. तसंच मायकल जॅक्सन यांचेही फोटो समोर आले आहेत. तर ब्रिटीश प्रिन्स अँड्र्यू हे ५ महिलांच्या मांडीवर झोपलेले आहेत. एपस्टिनच्या मांडीवर अल्पवयीन मुली दिसत आहेत. एपस्टिन फाईल्समध्ये साडे तीन हजारांपेक्षा जास्त फाईल्स आहेत. ज्यात अडीच जीबी पेक्षा जास्त फोटो आणि कागदपत्रांचा समावेश आहे. मात्र अनेक फोटोंमध्ये ते कुठे काढण्यात आले आहेत ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि जगाला हादरवून टाकणाऱ्या या फाइल्समधील अनेक गोष्टी अद्याप बाहेर येणं बाकी आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, अद्यापही अनेक कागदपत्र, थांबविण्यात आले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेले फोटो आणि कागदपत्रांचा सध्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल याबाबत आता काहीही सांगणं चुकीचं ठरेल. कारण अद्यापही मोठ्या संख्येने कागदपत्र जारी करण्यात आले असून त्याची समीक्षा सुरू आहे.
नक्की वाचा - कुणी, लेक देता का लेक! महिन्याला पगार, एका फ्लॅटची मालकी अन् बरंच काही...
एपस्टिन फाईल्समध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला असून बिल क्लिंटन यांचे मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो समोर आले आहेत. एपस्टिन फाईल्समध्ये मायकल जॅक्सनचेही फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 2.5 जीबीपेक्षा जास्त फोटो आणि दस्तऐवज समोर आले आहेत.
JUST IN: A large portion of the Epstein files have been released, showing photos of Jeffrey Epstein with high-profile associates including former President Bill Clinton.
— Collin Rugg (@CollinRugg) December 19, 2025
In one photo, Clinton was seen in a hot tub with anonymous female.
In another photo, Clinton is seen with… pic.twitter.com/TVlKhI6hYG
कोण होता जेफ्री एपस्टिन?
जेफ्री एपस्टिन हा अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाचा गुन्हेगार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि लैंगिक शोषणाचा आरोप होता. तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक फाइल्स सार्वजनिक होत आहेत. उच्चभ्रू व्यक्तिमत्त्वांच्या नावाचा समावेश असल्याने या केसची अधिक चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या अभियानादरम्यान याबाबत एक मोठी घोषणा केली होती. एपस्टिन फाइल्स पूर्णपणे सार्वजनिक करण्यात येईल, असंही म्हटलं होतं. विशेष म्हणजे एपस्टिनचे अनेक उच्चभ्रू व्यक्तींसोबत चांगले संबंध होते. तो बड्या व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवित असल्याचा आरोप आहे.
बिल क्लिंटन यांच्या नाव आल्याने खळबळ....
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या फोटोंचा समावेश आहे. यातील एका फोटोमध्ये क्लिंटन, एपस्टिनचे निकटवर्तीय आणि सहआरोपी घिस्लेन मॅक्सवेलसह स्विमिंग पुलमध्ये दिसून आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पुलमध्ये अन्य मुलीही दिसून येत आहेत. यापूर्वीही क्लिंटन यांनी या प्रकरणात एपस्टिनसोबत ओळखीवर दिलगिरी व्यक्त केली होती. एपस्टिनचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांमध्ये समावेश असल्याचं बिल क्लिंटन यांना माहीत नव्हतं, असं ते म्हणाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
