जाहिरात

बांगलादेशाचं नेतृत्व करणारे, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस कोण आहेत?

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात आज बांगलादेशात अंतरिम सरकारचा शपथग्रहण सोहळा पार पडणार आहे.

बांगलादेशाचं नेतृत्व करणारे, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस कोण आहेत?
ढाका:

बांगलादेशात आज नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकारचा शपथग्रहन सोहळा होणार आहे. बांगलादेशासाठी संपूर्ण आठवडा आव्हानात्मक राहिला आहे. अशात लष्कराकडून एक स्थिर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान मोहम्मद युनूस यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 

कोण आहेत मोहम्मद युनूस ?

  • मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी पूर्व बंगालमधील चितगाव येथे झाला, नंतर हा भाग बांगलादेशात गेला. 
  • मोहम्मद युनूस यांचे सुरुवातीचे शिक्षण चितगाव शाळेत झाले
  • नंतर ते उच्च शिक्षणासाठी ढाका विद्यापीठात गेले. 
  • 1957 मध्ये मोहम्मद युनूस यांनी अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं.  
  • 1960 मध्ये त्यांनी एमएमध्ये प्रवेश घेतला. 
  • पदव्युत्तर पदवीनंतर मोहम्मद युनूस संशोधनासाठी इकॉनॉमिक्स ब्युरोमध्ये रुजू झाले. 
  • 1965 साली मोहम्मद युनूस यांना अमेरिकेत शिकण्यासाठी फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवली. 
  • 1965 ते 1972 या काळात त्यांनी वँडरबिल्ट विद्यापीठात शिक्षण घेतलं. 
  • याच काळात 1969 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडीही केली. पुढे त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
  • मोहम्मद युनूस 1972 मध्ये चितगाव विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे एचओडी म्हणून बांगलादेशात परतले. 
  • 1974 मध्ये त्यांनी दुष्काळाच्या काळात आर्थिक पैलूंचा अभ्यास सुरू केला. 
  • यानंतर त्यांनी 1983 मध्ये बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेची पायाभरणी केली. 
  • ही बँक मायक्रोक्रेडिट (गरीब लोकांना हमीशिवाय छोटी कर्जे) प्रदान करते. 
  • त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मोहम्मद युनूस यांना 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 
  • आता बांगलादेशातील सत्तापालटानंतर 6 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Exclusive: बांगलादेशमधील बदलाचं खरं कारण काय? सत्ता स्थापनेस तयार नोबेल विजेत्यानं सांगितलं....

मोहम्मद युनूस यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत

  • ‘बिल्डिंग सोशल बिजनेस: द न्यू काइंड ऑफ कैपिटलिज्म दैट सर्व्स ह्यूमैनिटी' मोस्ट प्रेसिंग नीड्स' (2010) 
  • आणि ए वर्ल्ड ऑफ थ्री जीरोज: द न्यू इकनॉमिक्स ऑफ जीरो पॉवर्टी, जीरो अनएम्प्लॉयमेंट, एंड जीरो नेट कार्बन एमिशन' (2017) या पुस्तकांचा समावेश आहे.

मोहम्मद युनूस यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

  • बांग्लादेशचा प्रतिष्ठित स्वतंत्रता दिवस पुरस्कार (1987), 
  • वर्ल्ड फूड प्राइज (संयुक्त राज्य, 1994) 
  • यू.एस. प्रेसीडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम (2009) पुरस्कार मिळाले आहेत.
  • ते किंग हुसैन ह्यूमैनिटेरियन अवार्ड (जॉर्डन, 2000) प्राप्त करणारे पहिले व्‍यक्‍ती आहेत.
     
Listen to the latest songs, only on JioSaavn.com