फुटबॉल सामन्यादरम्यान फॅन्समध्ये तुंबळ हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त फुटबॉल फॅन्सनी एन'झेरेकोर पोलिस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 100 हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

पश्चिम आफ्रिकी देश गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेफरीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे फुटबॉल फॅन्स आपआपसात भिडले, ज्यामध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.  गिनीतील शहर एन जेरेकोर येथे फुटबॉल सामन्यादरम्यान रविवारी ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर व्हायरल या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये मैदानाबाहेर रस्त्यावर लोक आपाआपसात भिडत असल्याचं दिसून येत आहे. जमिनीवर अनेकजण जखमी अवस्थेत पडलेले देखील दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त फुटबॉल फॅन्सनी एन'झेरेकोर पोलिस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 100 हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

( नक्की वाचा :  Vaibhav Suryavanshi : 13 वर्षांच्या मुलाची आयपीएलमध्ये एन्ट्री, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी )

वादाचं कारण काय?

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयाने हिंसाचार सुरू झाला. यानंतर फॅन्सनी मैदानात घुसून हल्लाबोल केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले की हा सामना गिनी जंटा नेता मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित स्पर्धेचा भाग होता. 2021 च्या सत्तापालटात डुम्बौयाने सत्ता काबीज केली होती आणि स्वत:ला अध्यक्ष म्हणून स्थापित केले होते. पश्चिम आफ्रिकन देशात अशा स्पर्धा सामान्य झाल्या आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article