जाहिरात

INDIA vs Pakistan : पाकिस्तानकडून अब्दाली बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी, रेंज 450 किमी

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्दानी वेपन सिस्टम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी मिलिट्री ड्रिल एक्सरसाईज इंडस अंतर्गत झालं आहे.

INDIA vs Pakistan : पाकिस्तानकडून अब्दाली बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी, रेंज 450 किमी

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने शनिवारी अब्दाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची चाचणी सोनमियानी रेंजमध्ये केल्याची माहिती आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 450 किमी असल्याची माहिती समोर येत आहे. यातून पाकिस्तान आपली ताकद दाखवण्याचा फुसका प्रयत्न करत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कर सरावांर्तगत या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, सैन्याची ऑपरेशनल तयारी तपासणे आणि क्षेपणास्त्राची अॅडव्हान्स नेव्हिगेशन सिस्टम वैशिष्ट्यांसह प्रमुख तांत्रिक बाबी तपासणे हे या चाचणीचे उद्दिष्ट आहे. अब्दाली क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चाचणीदरम्यान पाकिस्तानी सेनेचे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडर लेफ्टिनंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्टॅटेजिक प्लांस डिव्हिजनचे डीजी मेजर जनरल शरहयार परवेज बट देखील उपस्थित होते. भारतासोबतच्या तणावपूर्ण स्थितीमुळे पाकिस्तान जाणूनबुजून शक्तीप्रदर्शन करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

(नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

पाकिस्तानची आर्थिक कोंडी

भारताने  पाकिस्तानविरोधात शनिवारी कठोर पाऊल उचललं आहे. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यानुसार पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा-  Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने यापूर्वी थेट व्यापार बंद केला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे कोणतीही वस्तू पाकिस्तानातून भारतात येणार नाही आणि भारतातून कोणतीही वस्तू पाकिस्तानला पाठवली जाणार नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: