Viral Video : खासदार रडतायत, जनता शिव्या देतेय; पाकिस्तान्यांची जाम टरकलीय

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी जाम घाबरलेत. टरकलेल्या पाकिस्तान्यांच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर गदारोळ माजलाय. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज लागणं सहज शक्य आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
खासदार घाबरला, संसदेत रडला
नवी दिल्ली:

India Strike in Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला (India Strikes Pakistan ) केला. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात हाहाकार माजला आहे. भारताने प्रतिउत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तान्यांची तंतरली आहे.

गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील 15 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रयत्न भारतीय सैन्य दलाने हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या या फोल प्रयत्नांनंतर भारतीय सैन्य दलाने आपले उग्र रूप पाकिस्तान्यांना दाखवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज सहजपणे लावता येईल की पाकिस्तानी किती घाबरले आहेत.

पाकिस्तानी खासदार घाबरला, संसदेतच रडला

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरीक घाबरले आहेतच शिवाय माजी सैन्य अधिकारी आणि सध्याचे खासदारही घाबरले आहेत. ताहीर इक्बाल यांनी पाकिस्तानच्या संसदेत रडत रडत भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की पाकिस्तान्यांची रक्षा करो. इक्बाल यांनी आपल्या भाषणात ही बाब देखील कबूल केली आहे की पाकिस्तानच गुन्हेगार आहे, त्यांनी माफी देखील मागितली आहे.

ड्रोन हल्ले झाले, पोलीस म्हणतात वीज पडली गुरुवारी पाकिस्तानात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन हल्ले झाले. यासंदर्भातला एक व्हिडीओदेखील सध्या व्हायरल झाला आहे. एका स्थानिक युवकाने पाकिस्तानी पोलीस आणि सैन्यावर आपला राग काढला. या युवकाने म्हटलंय की ड्रोन हल्ला झाला, पोलीस म्हणतायत की वीज पडलीय.

Advertisement

ड्रोन हल्ल्यानंतर रावळपिंडीत काय घडले ? सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये रावळपिंडीतील एका पत्रकाराने तिथली परिस्थिती काय आहे हे सांगितलं आहे. त्याने म्हटलं की रावळपिंडीत एक ड्रोन हल्ला झाला आहे. या पत्रकाराने पुढे म्हटले की, आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण रावळपिंडी मैदावात पीएसएलचा सामना होणार होता. मात्र मॅचच्या आधी इथे ड्रोन हल्ला झाला. रावळपिंडी हे पाकिस्तानातील एक गजबजलेलं शहर आहे.

पाकिस्तान्याने काढली आपल्या सरकारची लाज

आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील युवकाने आपल्या सरकारची आणि सैन्याची लाज काढली आहे. या युवकाने म्हटले की भारताने 24 मिसाईस डागली होती. यातील एकही मिसाईल रोखणं पाकिस्तानला शक्य झालं नाही. भारताने हवाई हल्ल्यात दहशतवादी अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. या युवकाने पुढे म्हटले की आपली चूक मान्य करण्याऐवजी पाकिस्तानी माध्यमे खोटा प्रचार करण्यात मग्न आहेत.

Advertisement

बुधवारी रात्री हवाई हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने 8 मे रोजी पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा रडार आणि हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती.