जाहिरात

Aashadhi Wari: पंढरीची वारी लंडनच्या दारी! 22 देश, 18 हजार किमीचे अंतर, 70 दिवसाचा प्रवास

लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ अनेक मराठी लोक जमा झाले होते. पांडूरंगाच्या पादूका यावेळी इथं पोहोचल्या.

Aashadhi Wari: पंढरीची वारी लंडनच्या दारी! 22 देश, 18 हजार किमीचे अंतर, 70 दिवसाचा प्रवास
लंडन:

आषाढी वारी निमित्ताने अनेक पालख्या, दिंड्या पंढरपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. पण एक अशी एक दिंडी आहे जी पंढरपुरवरून लंडनला पोहोचली आहे. होय कुणाला विश्वास पटणार नाही पण पंढरीची वारी थेट लंडनच्या दारी पोहोचली आहे. लंडनमध्ये राहाणाऱ्या विठ्ठल भक्तांनी ही वारी पंढरपूर इथून सुरु केली होती. त्याची सांगता आज म्हणजे 24 जुनला झाली आहे. त्यानंतर हे वारकरी साता समुद्रापार लंडनमध्ये आषाढी एकादशी साजरी करणार आहेत.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लंडन इथं राहाणारे अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने पंढरपूर ते लंडन ही वारी निघाली होती. लंडनच्या मराठी मंडळाने 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली.  ही वारी  22 देशातून, 70 दिवसांचा प्रवास करत आज मंगळवारी लंडनमध्ये पोहोचली आहे. लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ ही वारीची सांगता झाली. यावेळी लंडनमध्ये राहाणाऱ्या  मराठी जनांनी या दिंडीचे भव्य स्वागत केले. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Palkhi 2025: माऊलींची पालखी जेजुरीत, भंडारा- खोबऱ्याची उधळण करत भव्य स्वागत

Latest and Breaking News on NDTV

लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ अनेक मराठी लोक जमा झाले होते. पांडूरंगाच्या पादूका यावेळी इथं पोहोचल्या. त्यानंतर त्याचे मराठी परंपरेप्रमाणे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला. लंडनमध्ये टॉवर ब्रिज जवळ भगवे वातावरण यावेळी पाहायला मिळाले. ज्ञानोबा तुकारामाच जयघोष परदेशाच्या जमीनीवर यावेळी ऐकू आला. मराठी परंपरेची ओळख यानिमित्ताने झाली. 

ट्रेंडिंग बातमी - Love affair news: Facebook वर प्रेम जडलं, 12 वीच्या मुलासाठी नवऱ्याला सोडलं, प्रकरणाला असं वळण मिळालं की...

70 दिवसानंतर तीन खंड आणि 22 देशातून फिरणारी पंढरीची वारी लंडनला पोहोचली. अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती. आज महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाचा गजर घुमला. पंढरीच्या वारीचे वातावरण काही काळासाठी लंडनमध्ये राहाणाऱ्या मराठी माणसाला अनुभवता आले. पांडूरंगाचे आशिर्वाद असल्याने आम्ही इथ पर्यंत पोहोचू शकलो असं यावेळी अनिल खेडकर यांनी सांगितले. लंडनमध्ये पांडूरंगाचे एक मंदीर उभारण्याचा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com