
देवा राखुंडे
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज मंगळवारी जेजुरी मुक्कामासाठी दाखल झाला आहे. जेजुरी येथे आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण केली. जेजुरी येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याच मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमा झाले होते. पालखी बरोबर असलेल्या वारकऱ्यांचे ही जेजूरीत भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी सर्व वातावरण भक्तीमय झालं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )

जेजुरी येथे शैव आणि वैष्णवांची भेट होते. आज वारी सोळ्यात सहभागी असलेल्या लाखो वैष्णवजणांनी जेजुरीच्या खंडोबाचं म्हणजेच महादेवाचे दर्शन घेतलं आहे. तर जेजुरी येथे असलेल्या शिवभक्तांनी माऊलींचे दर्शन घेतलं. ही अनोखी भेट वारी निमित्त दरवर्षी होत असते. या क्षणाचे अनेक जण साक्षिदार होतात. शिवाय या क्षणासाठी ते वर्षभर वाट ही पाहातात. त्यामुळे आजचं जेजूरीचं वातावरण हे याची देही याची डोळा पाहण्या सारखं होतं.

संत ज्ञानेश्वर माऊलींचं शिवभभक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल आहे. यावेळी पिवळ्या भंडाऱ्यानं माऊलींचा रथ नाहून निघाला होता. येळकोट येळकोट, जय मल्हार' आणि 'माऊली माऊली' असा गजर करत खंडोबाच्या जेजुरीनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जेजूरीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

माऊलींचा आजचा मुक्काम जेजुरी येथे असणार आहे. सर्व वारकरी आज जेजूरीमध्येच विसावा घेतली. तर उद्या बुधवारी माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल. उद्याचा मुक्काम हा वाल्मिकीनगरी असलेल्या वाल्हे गावात असणार आहे. उद्या सकाळी हा सोहळा वाल्हे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. माऊलींची पालखी आळंदीहून पुणे, दिवे घाट सासवड मार्गे आज जेजूरीला पोहचली आहे. तिथेच पालखीचा आजचा मुक्काम असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world