जाहिरात
This Article is From Sep 17, 2024

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना मेलोनींनी दिल्या शुभेच्छा, वाढदिवशी दिलं वचन

PM Modi Birthday : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना मेलोनींनी दिल्या शुभेच्छा, वाढदिवशी दिलं वचन
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई:

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवशी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. देश आणि विदेशातील वेगवेगळ्या पक्षांचे नेते, दिग्गज व्यक्ती यांनी त्यांच्या दीर्घाआयुष्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मेलोनी यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवरुन मोदींनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. 

( नक्की वाचा : जॉर्जिया मेलोनींनी PM मोदींसोबत शेअर केला व्हिडिओ, मोदींकडूनही आलं उत्तर )
 

इटलीच्या पंतप्रधानांनी यावेळी लिहिलं की, 'मला खात्री आहे की आपण इटली आणि भारत यांची मैत्री आणि सहकार्य आणखी बळकट करु. आपण जागतिक आव्हानांचा एकत्र सामना करु'

( नक्की वाचा : कोण आहेत जॉर्जिया मेलोनी? मेलोनींबाबतच्या 'या' आहेत 10 रंजक गोष्टी )
 

पंतप्रधान मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये झाला. भारतीय जनता पार्टीमधील पक्ष संघटनेत काम केल्यानंतर मोदी 2002 साली पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्तवाखाली एनडीएनं सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकणारे पंतप्रधान मोदी हे पंडित नेहरु यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत. 

( नक्की वाचा : PM Modi Birthday : डिजिटल इंडिया ते कलम 370, देश बदलणारे हे आहेत मोदींचे 9 मोठे निर्णय )
 

पंतप्रधान मोदी यांनी जून महिन्यामध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या निमंत्रणानंतर जी7 परिषदेत भाग घेतला होता. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: