जाहिरात

​PM Modi France Visit: मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक

त्यामुळेच जगातील बडे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि जागतिक नेत्यांची हे हॉटेल पहिली पसंती असते.

​PM Modi France Visit: मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या नीस शहरातील ऐतिहासिक आणि अलिशान ले नेग्रेस्को हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत
  • ले नेग्रेस्को हॉटेल समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असून ते केवळ हॉटेल नाही तर चालती-फिरती आर्ट गॅलरी आहे
  • या हॉटेलमध्ये दुर्मिळ चित्रे, शिल्पे आणि फ्रेंच कलाकृतींचा मोठा संग्रह आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ज्या हॉटेलमध्ये राहीले आहेत त्याची चर्चा जास्त होत आहे. हे एक अलिशान शाही हॉटेल असून जगभरातले बडे लोक इथं वास्तव्यास येत असतात. हे हॉटेल फ्रान्समधील नीस (Nice) शहरात आहेत. विशेष म्हणजे हे हॉटल समुद्रकिनाऱ्यावर आहे.  या हॉटेलचे नाव 'ले नेग्रेस्को' (Le Negresco) आहे. या हॉटलचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक हॉटेल नाही तर चालती-फिरती आर्ट गॅलरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुक्कामामुळे हे हॉटेल सध्या जागतिक पातळीवर प्रचंड चर्चेत आले आहे. पण त्याचे एक रात्रीचे भाडे ऐकले तर तुम्ही आवाक झाल्या शिवाय राहाणार नाही.

हे एक ऐतिहासिक हॉटेल आहे.  या हॉटेल जनतेच्या सेवेसाठी 1913 आले होते. या हॉटेलला 100 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या इमारतीचा गुलाबी घुमट दुरूनही पर्यटकांना आकर्षित करतो. या हॉटेलमध्ये 20 व्या शतकातील दुर्मिळ चित्रे, शिल्पे आणि ऐतिहासिक फ्रेंच कलाकृतींचा संग्रह आहे. तो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. तो पाहील्या शिवाय कुणाला ही पुढे जावू वाटत नाही. त्याचे सौंदर्यच तुम्हाला भूरळ पाडते.  ज्यामुळे येथे आल्यावर हॉटेलऐवजी एखाद्या म्युझियममध्ये आल्याचा भास सर्वांनाच होतो.

नक्की वाचा - Shivsena Crisis: 'आता आमचं ऑपरेशन तुडवा', ठाकरेंची सेना आक्रमक, बंडखोर खासदारांची सुरक्षा वाढवली

हे हॉटेल खरोखर खास आहे.  या हॉटेलमधील प्रत्येक खोलीची रचना वेगवेगळ्या थीमवर आधारित आहे. अशा या अनोख्या  'ले नेग्रेस्को' हॉटेलचे भाडे काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जेवढं अलिशान हे हॉटेल आहे तेढवेच अलिशान त्याचे भाडे ही आहे. या हॉटेल मधील प्रीमियम सुइट्सचे एका रात्रीचे भाडे तब्बल 9,100 युरोपर्यंत आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे जवळपास 9 लाख रुपये होते. याचाच अर्थ एका रात्रीचे तब्बल नऊ लाख रूपये भाडं या हॉटेलचे आहेत. सर्वसामान्य माणसाच्या कित्येक महिन्यांच्या कमाईइतके या हॉटेलच्या एका रात्रीचे भाडे आहे. 

नक्की वाचा - EPFO Update: कर्मचाऱ्यांची मजा! मोठं टेन्शन मिटलं, आता थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे

त्यामुळेच जगातील बडे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि जागतिक नेत्यांची ही पहिली पसंती असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांच्या मुक्कामासाठी निवडण्यात आलेले 'ले नेग्रेस्को' हॉटेल सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरले आहे. या हॉटेलचे वैभव आणि तिथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत उच्च दर्जाच्या असल्याचं सांगितलं जातं. कोणताही मोठा जागतिक नेता फ्रान्समध्ये येतो, तेव्हा या हॉटेलचे नाव अग्रक्रमाने घेतो. शिवाय याच ठिकाणी राहणे हे मोठे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटी पसंत करतात. हे हॉटेल एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com