Indian Migrants Deporting : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (President Donald Trump) आदेशानंतर बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या प्रवाशांना देशाबाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतून एक अमेरिकी सैन्य विमान प्रवाशांना घेऊन भारतात रवाना झालं आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. वृत्त संस्था रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांचा दाखला देऊन सांगितलं की, C-17 सैन्य विमान भारतीय प्रवाशांना घेऊन रवाना झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात 205 जणं प्रवास करीत आहेत. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत तब्बल 7.25 लाख बेकायदेशीर भारतीय प्रवासी राहतात. अमेरिकेत सर्वाधित बेकायदेशीर प्रवासी मेक्सिकोतून त्यानंतर अल साल्वाडोर आणि तिसऱ्या क्रमांकावर भारतातील प्रवाशांची संख्या आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
- डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं मास डिपोर्टेशन
- अवैध भारतीय प्रवाशांवर कारवाई
- C-17 विमानातून भारतीयांची रवानगी
- 18,000 अवैध भारतीयांची यादी तयार
- अवैध भारतीयांना परत घेण्यावर सहमत
- अमेरिकेत 14 लाख बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रवाशांची यादी तयार
डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनवर कडक भूमिका अवलंबवली आहे. आतापर्यंत अमेरिकेतून सहा विमानातून नागरिकांना लॅटिन अमेरिकेत पाठविण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, इतिहासात पहिल्यांदाच आम्ही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना सैन्य विमानांतून मायदेशी पाठवित आहेत.
नक्की वाचा - Liang Wenfeng शिक्षकाच्या मुलानं उडवली अमेरिकेची झोप! AI क्रांती करणारा DeepSeek निर्माता कोण आहे?
भारतीयांकडे सर्वात जास्त H-1B Visa
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित केली. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेने तब्बल 18 हजार बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय प्रवाशांची ओळख पटवली आहे. अमेरिकेकडून एच-1बी व्हिसा अधिकतर भारतीयांना देण्यात आले आहेत.