इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर रविवारी कोसळल्याचं वृत्त समोर आलं होतं. रात्रभर हेलिकॉप्टरचा शोध घेतला जात होता. अखेर त्यांच्या हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला आहे. मात्र यामध्ये रईसी यांच्या निधनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेलिकॉप्टरचे अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडले आहेत. राष्ट्राध्यक्ष रईसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांच्यासह हेलिकॉप्टरमधील नऊ जण अद्याप सापडलेले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या जगण्याच्या आशा मावळल्या आहेत. शोधकार्यात गुंतलेल्या रेड क्रेसेंट टीमने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही जिवंत असण्याची चिन्हे नाहीत.
बातमी अपडेट होत आहे.