रशियातील कझानमध्ये 9/11 सारखा हल्ला करण्यात आला आहे. कझानमधील 6 रहिवाशी इमारतींना या हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले. जवळपास 8 ड्रोन्सच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. रशिया संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एक ड्रोन हल्ला रोखण्यात यश आलं आहे. युक्रेनने हल्ल केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कझान शहरावर झालेल्या या ड्रोन हल्ल्या मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. कझान एअरपोर्टवरील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. व्हिडीओमधील दृश्यामध्ये दिसून येत आहे की, ड्रोन इमारतींना जाऊन धडकत आहेत. हल्ल्यात काय नुकसान झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
( नक्की वाचा : अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष )
युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियाला पाठवलेल्या उत्तर कोरियाच्या सैन्याने युक्रेनियन ड्रोन शोधण्यासाठी अधिक देखरेख चौक्या उभारल्या आहेत. युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिसने ही माहिती दिली आहे. या युद्धात उत्तर कोरियाच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
(नक्की वाचा- Dinga Dinga Virus : 'या' देशात पसरलाय रहस्यमयी डिंगा डिंगा आजार, रुग्ण वेड्यासारखा करु लागतो नाच)
युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या वेबसाईटवर खुलासा केला की, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता उत्तर कोरियाच्या सैन्याने आता ड्रोनचा शोध घेण्यासाठी अधिकच्या चौक्या उभारल्या आहेत. पश्चिमेकडील सीमावर्ती भागात कुर्स्कमध्ये रशिया अजूनही उत्तर कोरियाच्या सैनिकांचा वापर करत आहे.