जाहिरात

Dinga Dinga Virus : 'या' देशात पसरलाय रहस्यमयी डिंगा डिंगा आजार, रुग्ण वेड्यासारखा करु लागतो नाच

Dinga Dinga Virus : 'या' देशात पसरलाय रहस्यमयी डिंगा डिंगा आजार, रुग्ण वेड्यासारखा करु लागतो नाच
मुंबई:

डिंगा डिंगा... हे कोणत्याही गाण्याचे किंवा जिंगलचे बोल  नाहीत तर एक रहस्यमय आजार आहे.  युंगाडामधील (Uganda) जवळपास 300 जणांना या रहस्यमयी आजाराची लागण झाली आहे. या आजारात माणसं चालता-चालता अचानक नाचू लागतात. त्यांचं शरीर त्यांच्या नियंत्रणात राहत नाही. युगांडामधील बुंदीबुग्यो या जिल्ह्यात या आजारानं शिरकाव केलाय. रुग्णांमध्ये महिला आणि मुलींचा जास्त समावेश आहे. 

बुंदीबुग्योमधील आरोग्य अधिकारी डॉ. कियता क्रिस्टोफर यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारामध्ये पहिल्यांदा ताप येतो त्यानंतर शरीर कापू लागतं. त्यानंतर त्याला चालणं अवघड होतं. या आजारामधील रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरु आहेत. या प्रकरणात आजवर कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या आजारचे रुग्ण आयुर्वेदीक औषधांमुळे बरे होतात, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. आम्ही या रुग्णांवर उपचार करत आहोत. सामान्यपणे या आजाराचे रुग्ण एका आठवड्यात बरे होतात. बुंदीबुग्यो क्षेत्राच्या जवळपासच्या भागात या आजाराचे रुग्ण आढळल्याची कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.'

या आजारातील रुग्णांच्या निष्कर्षांशी माहिती आरोग्य मंत्रालयाला कळवण्यात आलेले आहेत. आरोग्य मंत्रालयानं याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष )
 

1518 मध्ये पसरला होता डान्सिंग प्लेग

या आजारासारखाच एक आजार 1518 मध्ये फ्रान्समध्ये पसरला होता. डान्सिंग प्लेग असं या आजाराचं नाव होतं. फ्रान्समधील स्ट्रासबर्ग शहरातील नागरिकांना हा आजार झाला होता. या आजारातील पीडित रुग्ण त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध अनेक दिवस नाचत असतं. त्यामधील काही जणांना अती थकव्यानं मृत्यू झाला होता. 

कांगोमध्येही रहस्यमय आजार

आफ्रिकन देश कांगोमध्येही एका रहस्यमय आजाराचा फैलाव झाला आहे. या आजारामुळे जवळपास 400 जण प्रभावित झाले आहेत. ताप, डोकेदुखी, खोकला, नाक वाहणे आणि अंगदुखीचा त्रास या आजारातील रुग्णांना होत आहे. 

( नक्की वाचा : Syria War : 13 वर्षांमध्ये जमलं नाही ते 13 दिवसात कसं झालं? सीरियातील सत्तापालटाची Inside Story )
 

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार या परिसरात आत्तापर्यंत 394 जणांना आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 30 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. जागतिक आरोग्य संघटनेला या महिन्याच्या सुरुवातीला आजाराबाबत माहिती झाली. आता आरोग्य संघटनेकडून आजाराच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. याबाबत प्रयोगशाळेतील निष्कर्ष जाहीर होईपर्यंत आजाराचं कारण स्पष्ट होणार नाही, अशी माहिती WHO नं दिलीय.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com