जाहिरात

Trump-Putin Summit: ट्रम्प-पुतीन भेट राहिली बाजूला; रशिनय मंत्र्याच्या टीशर्टची जगभरात चर्चा

रशियन फॅशन ब्लॉगर्सनी टेलीग्रामवर या स्वेटशर्टची किंमत 120 डॉलर असून, तो चेलीयाबिन्स्क येथील 'सेल्सोवेत' (Selsovet) या ब्रँडचा असल्याचे सांगितले. हा ब्रँड 'सोव्हिएत वारसा' असलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Trump-Putin Summit: ट्रम्प-पुतीन भेट राहिली बाजूला; रशिनय मंत्र्याच्या टीशर्टची जगभरात चर्चा
Lavrovs attire choice is being seen as a nod to Kremalin's imperial ambitions.
  • Sergei Lavrov wore a sweatshirt with "CCCP", the Russian initials for the USSR, during the Alaska meeting
  • The sweatshirt was identified as a $120 item from Chelyabinsk-based Soviet heritage brand Selsovet
  • Lavrov’s attire is viewed as endorsing Kremlin’s narrative that Russians and Ukrainians are “one people”
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Trump-Putin Meet : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अलास्का येथे झालेल्या महत्त्वाच्या भेटीत अनेक गोष्टी घडल्या. मात्र जगातील या मोठ्या नेत्यांच्या भेटीएवढीच चर्चा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी घातलेल्यास्वेटशर्टने होत आहे. लावरोव्ह यांनी घातलेल्या स्वेटशर्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या स्वेटशर्टवर 'CCCP' लिहिले होते, जे सोव्हिएत युनियनचे (USSR) प्रतीक आहे. लावरोव्ह यांच्या या कृतीला एक 'माइंडगेम' आणि जाणीवपूर्वक केलेली कृती मानले जात आहे.

लावरोव्ह यांनी घातलेला स्वेटशर्ट साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला दर्शवणारा असल्याचे मानले जात आहे. रशियन आणि युक्रेनियन एकच असल्याच्या पुतिन यांच्या दीर्घकाळाच्या दाव्याला यातून बळ मिळते. हा दावा युक्रेनच्या कायदेशीर अस्तित्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला झुगारतो.

(नक्की वाचा-  Trump Putin Meet : अलास्काच्या बर्फात राजकीय धग! ट्रम्प-पुतिन यांची भेट भारतासाठी इतकी महत्त्वाची का?)

रशियन फॅशन ब्लॉगर्सनी टेलीग्रामवर या स्वेटशर्टची किंमत 120 डॉलर असून, तो चेलीयाबिन्स्क येथील 'सेल्सोवेत' (Selsovet) या ब्रँडचा असल्याचे सांगितले. हा ब्रँड 'सोव्हिएत वारसा' असलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

आंतरराष्ट्रीय नेत्यांचा तीव्र आक्षेप

लावरोव्ह यांच्या या पेहरावावर आंतरराष्ट्रीय नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. लिथुआनियाचे माजी परराष्ट्र मंत्री गॅब्रिएलियस लँड्सबर्गिस यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, 'एक वाटाघाटी करणारा माणूस USSR स्वेटशर्ट घालून म्हणतो की, आम्हाला फक्त युक्रेनचा अर्धा भाग द्या आणि आम्ही वचन देतो की आम्ही थांबू. लावरोव्ह यांचा USSR स्वेटशर्ट पुतिन राजवटीच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचे स्पष्ट संकेत आहे.

(नक्की वाचा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके नाराज का? पडद्यामागील खरी गोष्ट झाली उघड!)

सोव्हिएत युनियन किंवा युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (USSR) हे 1922 ते 1991 पर्यंत युरेशियाच्या मोठ्या भागात पसरलेले होते. 1991 मध्ये त्याचे विघटन झाले, ज्यामुळे रशिया आणि युक्रेन व्यतिरिक्त आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, लाटव्हिया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com