जाहिरात

Trending News: जमिनीत सापडले 15 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे अवशेष, जिराफसारखी मान पाहून शास्त्रज्ञही थक्क

थायलंडच्या जमिनीतून एक मोठं रहस्य उलगडलं आहे. ज्याने शास्त्रज्ञानांही आश्चर्याचा धक्का दिला आहे.कालासिनमध्ये खोदकामा दरम्यान शास्त्रज्ञांना एका विशाल डायनासोरचे अवशेष सापडले आहेत.

Trending News: जमिनीत सापडले 15 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे अवशेष, जिराफसारखी मान पाहून शास्त्रज्ञही थक्क
Long Necked Dinosaur Viral Story

Jurassic Period Fossils: थायलंडच्या जमिनीतून एक मोठं रहस्य उलगडलं आहे. ज्याने शास्त्रज्ञानांही आश्चर्याचा धक्का दिला आहे.कालासिनमध्ये खोदकामा दरम्यान शास्त्रज्ञांना एका विशाल डायनासोरचे अवशेष सापडले आहेत.15 कोटी वर्ष जुन्या एका डायनासोरच्या प्रजातीचे अवशेष सापडल्याने पेलियोन्टोलॉजीच्या जगात खळबळ उडाली आहे.या नव्या डायनासोरच्या प्रजातीचं नाव उरागासॉरस कालासिनेसिस (Uragasaurus kalasinensis) ठेवण्यात आलं आहे.जो त्याची लांब मान आणि शरीराच्या आगळ्यावेगळ्या रचनेबाबत चर्चेत आहे. 

अबब! डायनासोरची लांबी 20 मीटरपर्यंत

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, थायलँडमध्ये डायनासोरची एक नव्या प्रजातीबाबत माहिती समोर आलीय. लाखो वर्षांपूर्वी या प्रजातीचं अस्तित्व होतं.हा डायनासोरची मान खूपच लांब आणि त्याच्यात खूपच वेगळंपण असल्याचं उघडकीस आलंय.झाडांना खाणारा हा डायनासमोर जवळपास 15 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. त्याची लांबी 20 मीटरपर्यंत होती.सिटी स्कॅनमध्ये खूप वेगळी वाय-शेपसारखी रचना दिसली आहे, जी आधी कधीच पाहायला मिळाली नव्हती.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >> Nashik News: भावली धरण विनयभंग-मारहाण प्रकरणातील आरोपींना मकोका लागणार? 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

ज्युरासिक काळातील रहस्य उलगडलं

महासाराखाम यूनिव्हर्सिटीचे डॉ.अपीरूत निलपानापन आणि त्यांच्या टीमने यावर मोठं संशोधन केलं आहे.खोदकामा दरम्यान मिळालेल्या हाडांना जेव्हा सिटी स्कॅनमध्ये ठेवण्यात आलं,तेव्हा समजलं की हे मैमेनचीसॉरिडे कुटुंबाचं सदस्य आहेत. याचे अवशेष चीनमध्ये सापडले होते.संशोधनाच्या जागेवर 'फू नाई'(Phu Noi) मध्ये लेट जुरॅसिक काळातील अनेक अवशेष सापडले. येथे मिळालेल्या अवशेषांमध्ये जवळपास 90 टक्के अवशेष डायनासोरचे होते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com