जाहिरात

Nashik News: भावली धरण विनयभंग-मारहाण प्रकरणातील आरोपींना मकोका लागणार? 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत 9 आरोपींना अटक केली असून यापैकी 3 आरोपी फरार आहे. हे तिन्ही आरोपी कुख्यात गुंड असल्याची माहिती आहे.

Nashik News: भावली धरण विनयभंग-मारहाण प्रकरणातील आरोपींना मकोका लागणार? 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Nashik Tourist Molestation Case Update

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी 

Nashik Bhavli Dam Crime News : भावली धरणात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एका महिला पर्यटकाचाही विनयभंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.याप्रकरणी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत 9 आरोपींना अटक केली असून यापैकी 3 आरोपी फरार आहे. हे तिन्ही आरोपी कुख्यात गुंड असल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणातील 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. फिर्यादिंनी आरोपींना मकोका लावण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 

"एफआयआरमध्ये चुकीच्या गोष्टी.."

याप्रकरणी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी म्हटलंय की, "आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी आणि तरतुदी आहेत,तसच त्यांचे जे पूर्वाश्रमीचे गुन्हे आहे.हे संपूर्ण लाईन अप करून जर मकोका लागत असेल, तर त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत".दरम्यान, एफआयआरमध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.फिर्यादीने आरोपींना मारहाण केल्याचं वकिलांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा अपघात झाला, डोंबिवलीच्या तरुणीला जबर धक्का, घरातच स्वत:ला संपवलं

यापूर्वी आरोपी आकाश भोईरवर खुनाचा गुन्हा

आरोपी आकाश भोईर असून त्याच्यावर यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे,तो सध्या फरार आहे.गुन्ह्यात वापरलेली संबंधित दुचाकी या आरोपींपैकी कोणाचीही नाही.15 हजाराच्या बदल्यात कैलास भागडे याने गाडी वापरायला घेतली होती.संशयित आरोपी सचिन अढोळे विरोधात यापूर्वी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे.विशाल भटाटे या संशयित आरोपीविरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद आहे.यातील काही आरोपी भावली धबधबा परिसरात छोटा हत्ती गाडीत स्नॅक्स,मका वगैरे विकतात.

नक्की वाचा >> Pune News: कोणामुळे घडली मोशी कचरा डेपो दुर्घटना? 'त्या' दोन बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com