स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने (Stanford University) केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात जगातील सर्वात आळशी व्यक्ती राहणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. या संशोधनासाठी लोकांची शारीरिक सक्रियता आणि दररोज चाललेल्या पावलांची सरासरी मोजण्यात आली आहे. या आकडेवारीच्या आधारावर देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे. सर्वाधिक 'आळशी' व्यक्ती राहाणाफ्या जगातल्या टॉप टेन देशांची यादी जाहीर झाली आहे. या दहा देशांच्या यादीत भारताचा ही क्रमांक लागला आहे. ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. संशोधनानुसार, ज्या देशांमध्ये नागरिक दररोज सर्वात कमी पाऊले चालतात, त्यांना 'आळशी' म्हणून गणले गेले आहे.
या यादीत इंडोनेशिया हा देश सर्वात वरच्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये पहिला क्रमांक इंडोनेशिया या देशाने पटकावला आहे. जिथे लोक दररोज सरासरी 3,531 पाऊले चालतात. या यादीत दुसरा क्रमांक सौदी अरेबिया चा लागतो. या देशातील लोक सरारसी रोज 3,807 पावलं चालतात. तर तिसऱ्या स्थानी मलेशिया आहे. इथले लोक 3,963 पावलं चालत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.
फिलिपिन्स 4,008, दक्षिण आफ्रिका 4,105, कतार 4,158, ब्राझील 4,289 भारत 4,297 इजिप्त 4,315, ग्रीस 4,350, या देशांचा नंतर क्रमांक लागतो. या यादीत भारताचा क्रमांक हा आठवा आहे. सर्वात जास्त गंभीर आहे. या यादीनुसार, भारतीय नागरिक दररोज सरासरी 4,297 पाऊले चालतात. ज्यामुळे जगातील सर्वाधिक आळशी लोकांच्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 8 वा आहे. शारीरिक सक्रियता कमी असणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक आव्हान दर्शवते. यात सुधार येणे गरजेचे मानले जाते.
देश दररोज चाललेली सरासरी पावलं
- इंडोनेशिया 3,531
- सौदी अरेबिया 3,807
- मलेशिया 3,963
- फिलिपिन्स 4,008
- दक्षिण आफ्रिका 4,105
- कतार 4,158
- ब्राझील 4,289
- भारत 4,297
- इजिप्त 4,315
- ग्रीस 4,350