आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये 18 दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla Return) यांनी सोमवारी पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राकेश शर्मानंतर शुक्ला अंतराळात यात्रा करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत. एक्सिओम स्पेसने सांगितलं की, पृथ्वीवर 22.5 तासांचा प्रवास केल्यानंतर क्रू सकाळी 4.31 वाजता (मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.01 वाजता) कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरण्याची अपेक्षा आहे. पृथ्वीवर परतण्यापूर्वी या स्पेसक्राफ्टचं Undocking प्रक्रिया सुरू होईल.
Undocking काय आहे? (what is undocking)
जेव्हा एकमेकांना जोडलेले अंतराळ यान एकमेकांपासून वेगळे होतात, त्या प्रक्रियेला Undocking म्हटलं जातं. यामध्ये तीन टप्पे असतात. पहिली रिलीजची प्रक्रिया सुरू होते, त्यानंतर सेपरेशन (वेगळं होणं) ज्यात अंतराळ यानचा थ्रस्टर फायर त्याला दुसऱ्या स्पेसक्राफ्टपासून वेगळं करण्यास सुरुवात करतो. यानंतर वेगळं झालेलं अंतराळयान एक सुरक्षित अंतर ठेवेल, दोघांची एकमेकांना धडक होऊ नये हा प्रयत्न असेल. अशा पद्धतीने संपूर्ण Undocking प्रक्रिया पूर्ण होते. तिन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतर अंतराळयान पृथ्वीच्या दिशेने रवाना होतील.
स्वयंचलित असेल संपूर्ण प्रक्रिया...
ड्रॅगन अंतराळ यानाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनहून वेगळं होण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असेल. अनडॉकिंगनंतर ड्रॅगन इंजिन आवश्यक ऊर्जेसाठी काही प्रक्रियेतून जावं लागेल, त्यानंतर ते सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनपासून दूर जातील आणि पृथ्वीवर प्रवेशाची प्रक्रिया सुरू करतील.
नक्की वाचा - UAE Golden Visa : 23 लाखात गोल्डन व्हिजाचं सत्य उघड, UAE सरकारने केला मोठा खुलासा
किती वेळात पृथ्वीवर परततील...
पृथ्वीवर परतत असताना अंतराळ यानाला साधारण 1600 डिग्री सेल्सियस तापमानाचा सामना करावा लागेल. हे पॅराशूट दोन टप्प्यात काम करेल. पहिल्या टप्प्यात साधारण 5.7 किलोमीटरच्या उंचीवर स्टेबलायजेशन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साधारण दोन किलोमीटर इतक्या उंचीवर मुख्य पॅराशूट आपलं काम करेल. अनडॉकिंगच्या साधारण 22.5 तासानंतर कॅलिफोर्नियाच्या तटावर यान उतरण्याची अपेक्षा आहे. अंतराळ कॅप्सूलला एक विशेष जहाजाच्या माध्यमातून आणलं जाईल.
पृथ्वीवर परतल्यानंतर काय होईल?
पृथ्वीवरील पर्यावरणासाठी जुळवून घेण्यासाठी अंतराळवीरांना सुमारे सात दिवस पुनर्वसनात घालवावे लागतील. अंतराळ स्थानकावर गुरुत्वाकर्षण शून्य असतं. त्यामुळे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना काही वेळ द्यावा लागेल.