जाहिरात

Interesting news: एक कप कॉफी प्यायली अन् तरुणी झाली अब्जावधींची मालकीण, असं काय घडलं?

कारण बिलावर तिच्या कार्डमध्ये 63,000,000,000,000,000 (63 च्या पुढे 15 शून्य) पाउंड्स शिल्लक असल्याचे दिसत होते.

Interesting news: एक कप कॉफी प्यायली अन् तरुणी झाली अब्जावधींची मालकीण, असं काय घडलं?
  • इंग्लंडच्या सोफी डाउनिंगला कॉफी शॉपमध्ये तांत्रिक चुकीमुळे 63 क्वाड्रिलियन पाउंड्सची संपत्ती मिळाली
  • सोफीने 200 Degrees Coffee कॅफेतील गिफ्ट व्हाउचर वापरून माचा लाटे खरेदी केली आणि बिलावर मोठी रक्कम पाहिली
  • तांत्रिक बिघाडामुळे बारकोड नंबर चुकीने व्हाउचर बॅलन्स म्हणून सिस्टीममध्ये नोंदवला गेला, ज्यामुळे घोळ झाला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Sophie Downing coffee story: नशिबाचे चक्र कधी फिरेल याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथे राहणाऱ्या 29 वर्षीय सोफी डाउनिंगला आला आहे. एका कॉफी शॉपमधील तांत्रिक चुकीमुळे सोफी कागदोपत्री जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे. तिच्या कॉफी व्हाउचरमध्ये तब्बल 63 क्वाड्रिलियन पाउंड्सची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले. जी एलन मस्क यांच्या संपत्तीपेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे. हे घडले कसे आणि हा नक्की प्रकार काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 

सोफीला नाताळनिमित्त '200 Degrees Coffee' कॅफेचे 10 पाउंडचे गिफ्ट व्हाउचर मिळाले होते. अलीकडेच तिने या व्हाउचरचा वापर करून 'माचा लाटे' खरेदी केली. बिल मिळाल्यावर तिला धक्काच बसला. कारण बिलावर तिच्या कार्डमध्ये 63,000,000,000,000,000 (63 च्या पुढे 15 शून्य) पाउंड्स शिल्लक असल्याचे दिसत होते. ही रक्कम जगातील बड्या उद्योगपतींच्या एकूण संपत्तीपेक्षाही अधिक आहे. हे पाहून तिच्या डोळ्यांवर तिला विश्वासच बसला नाही. हे कसे झाले याचाच विचार ती करू लागली. 

नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला. व्हाउचर स्कॅन करताना त्यावरील रकमेऐवजी बारकोडचा नंबर सिस्टीममध्ये 'बॅलन्स' म्हणून गृहीत धरला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कॅफेमधील कर्मचारीही हा आकडा पाहून थक्क झाले. सोफीने गंमतीने म्हटले की, "मी इच्छिले तर संपूर्ण दुकान विकत घेऊ शकते, पण तांत्रिक चुकीमुळे ही रक्कम प्रत्यक्षात वापरता येणार नाही." त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही सुटकेचा निश्वास सोडला. सोफी जेव्हा '200 Degrees Coffee' कॅफेमध्ये गेली, तेव्हा तिने आपले गिफ्ट कार्ड वापरले. बिल दिल्यावर काउंटरवरील कर्मचारी आणि सोफी दोघेही अवाक झाले.

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

तांत्रिक घोळामुळे गिफ्ट कार्डचा बारकोड नंबरच थेट बॅलन्स म्हणून बीलवर छापून आला होता. सोफीने सोशल मीडियावर हे बिल शेअर करताच ती व्हायरल झाली. अनेकांनी गमतीने तिला "जगातील पहिली महिला क्वाड्रिलियनर" असे संबोधले आहे. ही घटना डिजिटल पेमेंट सिस्टीममधील त्रुटीचे एक मोठे उदाहरण ठरली आहे. तांत्रिक चुकीमुळे एखादी व्यक्ती कागदावर किती श्रीमंत होऊ शकते, हे यातून दिसून आले. सोफीची ही गोष्ट सध्या इंटरनेटवर आकर्षणाचे केंद्र बनली असून, लोक विचारत आहेत की इतक्या पैशांचे ती काय करणार? मात्र, ही केवळ तांत्रिक चूक असल्याने तिला हे पैसे प्रत्यक्षात खर्च करता येणार नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com