जाहिरात

Shocking : परदेशी तरुणीकडून शरीर सुखाची मागणी, नकार देताच आरोपीचं किळसवाणं कृत्य; Video पाहून पोलिसांचा संताप

एका महिला पर्यटकाने सोशल मीडियावर एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

Shocking : परदेशी तरुणीकडून शरीर सुखाची मागणी, नकार देताच आरोपीचं किळसवाणं कृत्य; Video पाहून पोलिसांचा संताप
तरुणाचं घृणास्पद कृत्य

Solo Female Traveller Harassment Case: न्यूझीलँडच्या एका महिला पर्यटकाने सोशल मीडियावर एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ही तरुणी श्रीलंकामध्ये टुक-टुकने प्रवास करीत होती. चौथ्या दिवशी स्थानिक तरुण स्कूटरवरुन तिचा पाठलाग करीत होता. त्या दिवशी दिवसाची सुरुवात तिने आनंदात केली. तिने सनराइज स्विम केलं आणि काही तासात वातावरण बदललं. महिलेने सांगितलं, तरुण वारंवार स्कूटरवरुन स्पीड कमी जास्त करीत पाठलाग करीत होता. 

सुरुवातील तरुणीने त्याला स्मित हास्य केलं. मात्र त्याची वागणूक बदलली होती. तिला वाटतं रस्ता बदलल्यानंतर तो निघून जाईल. मात्र तरीही तो तिचा पाठलाग करीतच होता. काही वेळाने महिलेने आराम करण्यासाठी टुक-टुक थांबवली, त्यावेळी तो पुन्हा तिच्याजवळ आला. 

श्रीलंकेचा तरुण नेमकं काय म्हणाला? 

महिलेला वाटतं तो मैत्री करण्याचा प्रयत्न करत असावा. मात्र तो तिला वैयक्तिक गोष्टी विचारू लागला. काही वेळाने तरुणाने कॅमेऱ्यावरच तिला शरीर सुखाची मागणी केली. आणि यानंतर मास्टरबेट करू लागला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो महिलेसमोर घाणेरडं कृत्य करीत आहे. 

Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ

नक्की वाचा - Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ

दिवसभर धक्क्यात होती परदेशी महिला...

घटनेनंतर महिला पुरती घाबरली होती. ती म्हणाली, मला विश्वास बसत नाही की त्याने मला असा प्रश्न विचारला. नकार दिल्यानंतरही त्याने त्याचं लिंग दाखविण्याची हिम्मत केली. तरुणी म्हणाली, संपूर्ण प्रवासादरम्यान तिला भीती वाटत होती. मला माझी ट्रिप खराब होऊ द्यायची नाहीये. पण माझा आत्मविश्वास ढळला. एकल महिलेने प्रवास करणं कधी कधी खूप भयंकर असतं. ती पुढे असंही म्हणाली, जग फिरण अत्यंत सुंदर आहे. पण प्रत्येक दिवस सोपा नसतो. 

Latest and Breaking News on NDTV

श्रीलंका पोलिसांनी केलं अटक

आपल्या इन्स्टाग्राम कॅप्शनवर तिने स्पष्ट केलं, हे केवळ एका व्यक्तीचं कृत्य होतं. संपूर्ण श्रीलंकेचं नाही. तिला श्रीलंकेच्या प्रवासात अनेकांनी मदत केली. मात्र ही घटना वेगळी होती. या घटनेनंतर श्रीलंका पोलिसांनी त्या आरोपी तरुणाला अटक केली आहे. 


  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com