जाहिरात

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या, यानातील गळतीमुळे मोठी अडचण 

अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेश स्टेशनमध्ये घेऊन जाणाऱ्या बोइंग स्टारलाइनरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या, यानातील गळतीमुळे मोठी अडचण 
नवी दिल्ली:

अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेश स्टेशनमध्ये घेऊन जाणाऱ्या बोइंग स्टारलाइनरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट या अंतराळ यानात बिघाड झाल्याने नासामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळातच अडकून पडल्या आहेत.

5 जून रोजी लॉन्चिंग झाल्यानंतर कॅप्सूलमध्ये पाच हिलियम गळती झाली आहे. याशिवाय पाच थ्रस्टर्स बंद झाले आहेत आणि स्टारलाइनरमध्ये पुढील ४५ दिवसांचा इंधनपुरवठा आहे, अशीही माहिती आहे. त्यामुळे अंतराळात चालक दल आणि ह्यूस्टनमधील मिशन व्यवस्थापकांना मिशनच्या मध्यभागी दुरुस्ती करण्यात अधिक वेळ घालवावा लागत आहे.

नक्की वाचा - शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

यादरम्यान नासाचे कॉमर्शियल क्रू मॅनेजर स्टिव्ह स्टिच यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, स्टारलाइनर 45 दिवसांपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर डॉक केलं जाऊ शकतं. सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळातून भरारी घेतली आहे. त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 5 जून रोजी पोहोचले होते. दरम्यान नासाच्या सूत्रांनुसार, स्टारलाइनर 6 जुलै रोजी पृथ्वीवर परतणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com