जाहिरात

Trending News: भिक्षा मागितलेल्या पैशातून लागली 2 कोटींची लॉटरी, बँकेने दिली भिक्षूकाला माहिती, पण त्याच वेळी

शेवटी बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना या लॉटरीची माहिती दिली.

Trending News: भिक्षा मागितलेल्या पैशातून लागली 2 कोटींची लॉटरी, बँकेने दिली भिक्षूकाला माहिती, पण त्याच वेळी
  • मलेशियातील ७३ वर्षीय भिक्षू चान चाई सियांग यांना २.२८ कोटी रुपयांची लॉटरी लागली
  • बँक अधिकाऱ्यांनी त्यांना लॉटरीची माहिती दिली, पण सुरुवातीला भिक्षू यांनी सायबर फ्रॉड समजला
  • चान यांनी ४० वयात संन्यास घेतला. ते आश्रमात साध्या जीवनशैलीने जगत होते

World News: मलेशियामध्ये एक सगळ्यांना चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका भिक्षूला जवळपास  2.28 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. चान चाई सियांग असे त्यांचे नाव आहे. तर त्यांचे वय 73 वर्ष आहे. त्यांनी कधी ही आपण करोडपती होवू असा स्वप्नातही विचार केला नसेल. पण ते रातोरात करोडपती झाले. विशेष म्हणजे, बँक अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी सायबर फ्रॉड समजून 3 वेळा हा फोन कट केला. शेवटी बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना या लॉटरीची माहिती दिली.

चान चाई सियांग हे सुरूवातीला एका कंपनीत काम करत होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता. तेव्हापासून ते एका आश्रमात होते. तिथे ते आपलं  साधे पणाने जीवन जगत होते. भाविकांकडून त्यांना दानाच्या स्वरूपात जे पैसे मिळायचे, त्यातून ते कधी 228 रुपये तर कधी त्याहून थोडे जास्त पैसे बँकेत जमा करत होते. याच छोट्या बचतीमुळे बँक ऑफ बीएसएनच्या लकी ड्रॉमध्ये त्यांचा समावेश झाला. नशिब ही त्यांच्या बाजून होते. त्यामुळे हा लकी ड्रॉ त्यांनाच लागला. त्यांना एक मोठी रक्कम मिळाली. 

नक्की वाचा - Sanjay Dina Patil: दीड मिनिटं, 3 वेळा शिव्या, 6 वेळा धमक्या! यांना खासदार म्हणावं की गुंड? पत्रकारांना थेट...

​इतकी मोठी रक्कम जिंकूनही चान यांना आनंद झाला नाही. त्यांनी पैशांबद्दल आपल्याला कोणताही मोह नाही असं म्हटलं आहे.  "हा कोणताही चमत्कार नसून माझ्या पूर्वजन्माच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. थायलंडच्या तुलनेत मलेशियामध्ये भिक्षूंना कमी आर्थिक मदत मिळते. त्यामुळे हा सर्व पैसा स्वतःसाठी न ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी हा पैसै दान करण्याचं ठरवलं आहे. शिवाय त्यातून भिक्षूंना चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ही त्याने सांगितले आहे. 

नक्की वाचा - Lohagad case: केतन अग्रवालच्या हत्ये मागे क्राईम पेट्रोल कनेक्शन! सिया- चेतनला 1 नाही तर 2 गोष्टी नडल्या

ते म्हणाले आजारी भिक्षूंच्या उपचारासाठी आणि समाजकार्यासाठी दोन भागात दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. "पैशाचा योग्य वापर करून इतरांना आनंद देणे, हीच पैशाची खरी किंमत आहे," असे चान यांनी म्हटले आहे. यातील एक मोठा हिस्सा गंभीर आजारी भिक्षूंच्या उपचारासाठी वापरला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर उर्वरित हिस्सा धार्मिक व सामाजिक कार्यासाठी दिला जाईल असं ते म्हणाले. पैशाचा योग्य विनियोग करणे हीच त्याची खरी किंमत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com