Iran War: यूएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जणांवर अटकेची टांगती तलवार! 1 वर्षाच्या जेलसह लाखोंचा दंड बसू शकतो

यूएईमध्ये युद्धाच्या संदर्भात खोटे आणि कृत्रिम (AI) व्हिडिओ शेअर केल्याबद्दल 35 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 19 भारतीय असून त्यांच्यावर सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Iran vs US-Israel War: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता सोशल मीडिया युजर्सना बसू लागल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि खोटे व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी 35 जणांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

धक्कादायक म्हणजे यामध्ये 19 भारतीयांचा समावेश असून, त्यांच्यावर एआय (AI) द्वारे तयार केलेले बनावट व्हिडिओ आणि अफवा पसरवल्याचा आरोप आहे. मध्यपूर्वेतील  यूएईच्या ॲटर्नी जनरलनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर चुकीची माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेले बनावट स्फोटांचे व्हिडिओ पसरवल्याप्रकरणी 35 जणांविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी केले आहे.

Advertisement

तीन गटांमध्ये विभागलेले गुन्हेगार

तपासानुसार, आरोपींनी तीन वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे केले आहेत. यातील 10 जणांनी देशाच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्रे रोखली जात असल्याचे खरे व्हिडिओ चुकीच्या कॉमेंट्री आणि साऊंड इफेक्टसह शेअर केले. लष्करी तळांच्या विनाशाचे खोटे दावे करून लोकांमध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात 5 भारतीय आहेत.

(नक्की वाचा-  Chandrapur News: नवस फेडायला गेले अन् भयंकर घडलं! सातबहिणी डोंगरावर थरार; 3 वर्षांच्या चिमुरडीसह चौघे जखमी)

इतर 7 जणांनी एआय (AI) वापरून बनावट स्फोट, आगीचे गोळे आणि ध्वजांचा वापर करून खोटे व्हिडिओ तयार केले. यातही 5 भारतीय आहेत. तर आणखी 6 जणांनी इराणच्या (hostile state) लष्करी कारवायांचे आणि नेतृत्वाचे कौतुक करून यूएईच्या राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा पोहोचवत होते. यातही  भारतीय आहेत.

कडक कायद्याचा बडगा

यूएईच्या सायबर कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. किमान 1 वर्षांची कैद आणि किमान 1 लाख एईडी (UAE Dirham) म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 23 लाख रुपयांहून अधिक दंडाची तरतूद आहे. 

(नक्की वाचा-  Ahilyanagar News: पारनेर हादरलं! कीर्तनकार महाराजाचं नराधम कृत्य; अमानुष छळ करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार)

सध्याची परिस्थिती आणि धमकी

इराणने यूएईमधील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणच्या तेल निर्यात केंद्रावर (खर्ग बेट) हल्ला करण्यासाठी यूएईच्या तळांचा वापर केल्याचा आरोप तेहरानने केला आहे. याच तणावाचा फायदा घेऊन काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत, ज्यावर आता यूएई सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article