UAE : युएईचा मोठा धक्का! नऊ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाबंदी, वाचा काय होणार परिणाम

UAE Visa Ban : अमेरिकेनं H1B1 व्हिसाच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. या निर्णयावर चर्चा सुरु असतानाच आशिया खंडातील परदेशी नागरिकांच्या नोकरी आणि व्यवसायचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) यूएईनं मोठा निर्णय घेतलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

UAE Visa Ban : अमेरिकेनं H1B1 व्हिसाच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. या निर्णयावर चर्चा सुरु असतानाच आशिया खंडातील परदेशी नागरिकांच्या नोकरी आणि व्यवसायचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) यूएईनं मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. युएईने आफ्रिका आणि आशियातील नऊ देशांच्या नागरिकांसाठी नवीन पर्यटन आणि नोकरीसाठीचे व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. एका गोपनीय इमिग्रेशन परिपत्रकातून हा मोठा धोरणात्मक बदल समोर आला आहे. 2026 पासून हा निर्णय लागू असून, यामागे सुरक्षा आणि स्थलांतरणासंबंधीच्या चिंता असल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे निर्णय?

यामुळे अफगाणिस्तान, लिबिया, येमेन, सोमालिया, लेबनॉन, बांगलादेश, कॅमेरून, सुदान आणि युगांडा या देशांच्या नागरिकांना नवीन व्हिसासाठी अर्ज करता येणार नाही. ही केवळ तात्पुरती व्हिसाबंदी असून, ज्यांच्याकडे आधीपासूनच वैध व्हिसा आहे, त्यांना या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच युएईमध्ये राहू आणि काम करू शकतात.

( नक्की वाचा : Baba Vanga: 2026 मध्ये तिसरे महायुद्ध, AI आणि एलियन्सचा धुमाकूळ; बाबा वेंगाच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी )
 

युएईच्या या निर्णयामुळे अनेक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. कामगारांसाठी व्हिसा स्थगित केल्यामुळे या देशांमधून येणाऱ्या मनुष्यबळावर अवलंबून असलेल्या उद्योगांना फटका बसू शकतो. तसेच, या निर्णयामुळे युएई आणि संबंधित देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच मानवतेच्या दृष्टिकोनातून, युएईमध्ये रोजगार किंवा चांगल्या जीवनाची अपेक्षा असलेल्या लोकांसाठी हा निर्णय मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

( नक्की वाचा : Emmanuel Macron : फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी खरंच पुरुष आहेत? वाचा का आली पुरावा देण्याची वेळ )
 


युएईने या बंदीची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु लीक झालेल्या परिपत्रकाची सत्यता अनेक स्त्रोतांनी पडताळली आहे. या अधिकृत माहितीच्या अभावामुळे प्रभावित देशांच्या नागरिकांमध्ये गोंधळ आणि चिंता वाढली आहे. जागतिक नेते आणि संघटना या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article