जाहिरात

Baba Vanga: 2026 मध्ये तिसरे महायुद्ध, AI आणि एलियन्सचा धुमाकूळ; बाबा वेंगाच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी

Baba Vanga Prediction:  2026 हे वर्ष आता जवळ आले आहे आणि बल्गेरियाच्या प्रसिद्ध गूढवादी बाबा वेंगा यांच्या 2026 सालासाठी केलेल्या भविष्यावाणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Baba Vanga: 2026 मध्ये तिसरे महायुद्ध, AI आणि एलियन्सचा धुमाकूळ; बाबा वेंगाच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी
Baba Vanga Prediction: बा वेंगा यांनी येत्या वर्षासाठी काही मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी व्यक्त केली आहे.
मुंबई:

Baba Vanga Prediction:  2026 हे वर्ष आता जवळ आले आहे आणि बल्गेरियाच्या प्रसिद्ध गूढवादी बाबा वेंगा यांच्या 2026 सालासाठी केलेल्या भविष्यावाणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या अनुयायांच्या मते, बाबा वेंगा यांनी येत्या वर्षासाठी काही मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी व्यक्त केली आहे. यात तिसरे महायुद्ध, एलियनचा पृथ्वीवर संपर्क, AI चे मानवावर पूर्ण नियंत्रण आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची शक्यता आहे.

1. तिसरे महायुद्ध

बाबा वेंगा यांच्या सर्वात मोठ्या भाकितांपैकी एक म्हणजे 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे युद्ध पूर्वेकडून सुरू होईल आणि त्याचा परिणाम पाश्चिमात्य देशांवर होईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन एक मोठे जागतिक नेते म्हणून उदयास येतील, असेही म्हटले जाते.

2. एलियनशी संपर्क

बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये एलियनशी मानवांचा संपर्क होऊ शकतो असे भाकीत केले आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये एक मोठे अंतराळयान पृथ्वीवर येईल, असा त्यांचा अंदाज आहे.

( नक्की वाचा : Emmanuel Macron : फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी खरंच पुरुष आहेत? वाचा का आली पुरावा देण्याची वेळ )
 

3. AI चा ताबा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या ताकदीमुळे बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी महत्त्वाची ठरते. त्यांनी सांगितले होते की, 2026 पर्यंत AI इतके प्रगत होईल की ते मानवी जीवनावर नियंत्रण मिळवेल. नोकरीपासून ते वैयक्तिक नात्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत AI चा प्रभाव वाढेल.

4. नैसर्गिक आपत्ती

याव्यतिरिक्त, बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवली आहे. यात भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि मोठे हवामान बदल होतील, ज्यामुळे पृथ्वीचा 7-8% भूभाग नष्ट होऊ शकतो, असे त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे.

( नक्की वाचा : Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये )
 

कोण होत्या बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये सध्याच्या उत्तर मॅसेडोनियामध्ये झाला होता. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी एका वादळात त्यांची दृष्टी गेली. त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे की त्याच वेळी त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली.

वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत बाबा वेंगा भाकिते आणि उपचार करण्यात इतक्या प्रसिद्ध झाल्या होत्या की केवळ सामान्य लोकच नव्हे, तर बल्गेरियाचा राजा बोरिस तिसरा आणि सोव्हिएत नेते लिओनिद ब्रेझनेव्ह यांच्यासारखे दिग्गजही त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. 1996 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्या बल्गेरियातील पेट्रिच येथे ज्या घरात राहत होत्या, ते आता एक संग्रहालय बनले आहे.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञान आणि माहितीवर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची पुष्टी करत नाही.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com