डेस्क बदलल्याने कर्मचारी चिडला! कंपनीला कोर्टात खेचून 25 लाख जिंकले; चक्रावणारी केस काय?

UK Office Politics News Man Won 25 Lakh: कर्मचारी हा 'अपमान' सहन करू शकला नाही आणि रोजगार न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. न्यायाधिकरणात कर्मचारी आणि कंपनी आमनेसामने आले आणि नंतर निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Office Politics Dispute: कॉर्पोरेट जगतात काम करताना अनेकदा बॉसकडून, संस्थेकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. मात्र एखादा साधा कर्मचारी अशा दडपशाहीला बळी न पडता संपूर्ण कंपनीवर भारी पडू शकतो. असाच प्रकार युकेमध्ये घडला आहे. यूकेमधील एका कर्मचाऱ्याने कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आणि त्याची मजबूत बाजू मांडून तो जिंकला. खटला जिंकल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीकडून २५ लाख रुपये मिळाले. (Office Politics News)

द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, एका कंपनीने ५३ वर्षीय वरिष्ठ इस्टेट एजंट निकोलस वॉकरला 'कमी दर्जाचा' कर्मचारी बनवले होते. कर्मचारी हा 'अपमान' सहन करू शकला नाही आणि रोजगार न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. न्यायाधिकरणात कर्मचारी आणि कंपनी आमनेसामने आले आणि नंतर निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने गेला.

उर्दू शिकवणारा शिक्षक, व्यापारी मित्र अन् पाकिस्तानचा व्हॉटसअप ग्रुप, काय आहे नागपूर कनेक्शन?

कर्मचाऱ्याने कंपनीला न्यायालयात खेचले!
या प्रकरणावर निकाल देताना रोजगार न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, वरिष्ठ कर्मचाऱ्याला 'कमी दर्जाच्या' डेस्कवर नियुक्त करणे हे त्याला बडतर्फ करण्यासारखे आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, वरिष्ठ कर्मचाऱ्याचे डेस्क बदलणे हे पदावनतीच्या श्रेणीत ठेवले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वॉकर २०१५ पासून हर्टफोर्डशायरस्थित रॉब्सन्स इस्टेट एजन्सीमध्ये काम करत होता आणि त्याच्या दोन शाखा रिकमन्सवर्थ आणि चोर्लेवुडचे व्यवस्थापन करत होता. 'कमी दर्जाच्या' कर्मचाऱ्याचे पद मिळाल्यानंतर निकोलसला अपमानित वाटले आणि त्याने राजीनामा दिला.

निकोलस वॉकरचा असा विश्वास होता की अशा प्रकारे त्याचे पद कमी करणे म्हणजे पदावनती, कारण त्याला कनिष्ठ कर्मचाऱ्यांसह बॅक डेस्क देण्यात आला होता. जेव्हा निकोलसने याबद्दल विक्री संचालक डॅनियल यंगशी बोलले तेव्हा ते म्हणाले, 'तुमच्या वयाचा माणूस डेस्कवरून असा गोंधळ घालू शकतो यावर माझा विश्वास बसत नाही'. यानंतर निकोलसने परिणामांचा विचार न करता थेट राजीनामा दिला.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: मशिदीखाली आढळलं भुयार, मंचरमध्ये एकच खळबळ, नक्की प्रकार काय?