
अविनाश पवार
एका घटनेनं सध्या खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मध्यवर्ती भागातील एका मशिदीखाली रस्त्याचं काम सुरू आहे. या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला. त्यानंतर मशिदी मध्ये भुयारासारखी रचना दिसून आली आहे. ही बातमी वाऱ्या सारखी परसल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र मशिदीच्या खाली असलेल्या भुयारात काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने तणावाची स्थिती रात्री उशिरा निवळली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने मंचर नगर पंचायत व पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
मशिदीच्या खाली भुयार आढळल्याने मंचर शहरात एकच खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्या सारखी परसली. त्यानंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी दर्ग्याच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेतला होता. शिवाय ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. एकीकडे आक्षेप घेतला जात होता तर दुसरीकडे झालेल्या नुकसानीचा निषेध केला जात होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.
नक्की वाचा - Pune News: आयुष कोमकरच्या हत्ये आधी काय घडलं? थरारक घटनाक्रम सांगताना आई ढसाढसा रडली
या वादामुळे दोन समाजात किरकोळ तणाव निर्माण झाला होता. वातावरण तापण्या पूर्वीच पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण भुयाराची पाहणी केली. मात्र त्यात कबर सोडून काही आढळून आले नाही. त्यानंतर मशिदीच्या खचलेल्या भागाचे काम करण्याचे ठरले असून तणाव निवळला आहे. असे असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे.मात्र काही वेळासाठी शहरात या भूयारामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी ही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world