अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील महिला खासदार मॅरी अल्वाराडो गिल यांच्यावर एका माजी कर्मचाऱ्यांने गंभीर आरोप केले आहेत. गिल यांनी माजी चीफ स्टाफवर लैगिंक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर खासदारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार गिल यांच्या शारीरिक गरजा न भागवल्यामुळे पीडित कर्मचाऱ्याला डिसेंबरमध्ये नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं, असाही आरोप आहे. मात्र गिल यांच्या वकिलाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पैशांसाठी हा कर्मचारी असे आरोप करत आहे, असंही वकिलांनी म्हटलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अल्वाराडो गिल यांनी कॉन्डिट नावाच्या एका व्यक्तीला आपला चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आता याच कर्मचाऱ्याने खासदार गिल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कॉन्डिटने आरोप केला की, गिल यांनी ऑफिसमध्ये आणि प्रवासादरम्यान माझा सेक्स गुलाम म्हणून वापर केला. जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला.
(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर)
Senator Marie Alvarado-Gil
कॉन्डिटने आरोप केले की, अल्वाराडो गिल यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवल्यामुळे माझ्या पाठ आणि पार्श्वभागाला जखमा झाल्या आहेत. नोकरी वाचवण्यासाठी मी हे सगळे अत्याचार सहन केले. प्रवासादरम्यान देखील मला हे सगळं सहन करावं लागत असे. अनेकदा गाडीमध्ये शारीरिक संबंध बनवण्यासाठी माझ्यावर खासदार दबाव टाकत असे. कारमध्ये जागेअभावी मला उलट-सुलट हालचाली कराव्या लागत असे. त्यामुळे माझ्या पाठीला गंभीर इजा झाली.
(नक्की वाचा -नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची)
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अल्वाराडो गिल यांचं एक जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या संसदेत सादर केलेल्या बिलवर समर्थन मागतान दिसत आहेत. अमेरिकेतील हिंसा आणि लैंगिक अत्याचाराबाबत त्या बोलताना दिसत आहेत.