अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 'पैसे द्या, अमेरिकन नागरिकत्व मिळवा' ही 'गोल्ड कार्ड' किंवा 'गोल्डन व्हिसा' योजना हिट झाली आहे . 50 लाख डॉलर्समध्ये कायमस्वरूपी अमेरिकन नागरिकत्व आणि पर्यायी नागरिकत्व देणाऱ्या या योजनेचा एका दिवसात 1000 लोकांनी फायदा घेतला आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत, असा दावा अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हॉवर्ड लुटनिक यांनी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, गोल्ड कार्ड योजना दोन आठवड्यांनी औपचारिकपणे सुरू होईल. इलॉन मस्क सध्या त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करत आहेत. परंतु योजना सुरू होण्यापूर्वीच, एकाच दिवसात एक हजार गोल्ड कार्ड विकले गेले आहेत.
(नक्की वाचा- 5 मुलांची आई, अनेक अफेअर्स; ट्रम्प यांच्या विभक्त पत्नीला मिळाला नवा बॉयफ्रेंड)
गोल्ड कार्ड योजनेचे फायदे स्पष्ट करताना लुटनिक म्हणाले, "जर तुम्ही अमेरिकन नागरिक असाल तर तुम्हाला जागतिक कर भरावा लागेल आणि बाहेरून लोक जागतिक कर भरण्यासाठी अमेरिकेत येणार नाहीत. जर तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल किंवा आता गोल्ड कार्ड असेल तर तुम्ही अमेरिकेचे कायमचे रहिवासी होऊ शकता आणि तुम्हाला कर देखील भरावा लागणार नाही.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, इंजिनिअर लेकाला मुस्लीम देशात अटक, प्रकरण काय?)
गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना 50 लाख डॉलर्स देऊन अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार मिळेल. गोल्ड कार्ड देण्यापूर्वी, अर्जदाराची सखोल चौकशी केली जाईल आणि अर्जदार कायद्याचे पालन करतो की नाही हे पाहिले जाईल. त्यामुळे ते चांगले लोक असतील, जे कायद्याचे पालन करतील. जर ते बेकायदेशीर कामात सहभागी असतील तर त्यांचा नागरिकत्व कायमचं रद्द केले जाईल, असंही लुटनिक यांनी सांगितलं.
ट्रम्प प्रशासनाने 10 लाख गोल्ड कार्ड विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गोल्ड कार्ड योजनेमुळे देशात गुंतवणूक वाढेल. या गोल्ड कार्ड्स विकून जमा होणारे पैसे देशाचे कर्ज कमी करण्यासाठी वापरले जातील.