व्हेनेझुएलावर आता कोणी हल्ला केला? अज्ञात ड्रोनच्या घिरट्या; राष्ट्रपती भवनाबाहेर गोळीबाराचा भयंकर Video

Venezuela Live Updates: सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Venezuela Updates

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या ऑपरेशननंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचं चित्र आहे. सोमवारी, ५ जानेवारी रोजी रात्री उशीरा व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती भवनाजवळ गोळीबार झाला. एएफपीच्या रिपोर्टनुसार, सरकारच्या एक निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं, मिराफ्लोरेस महलाच्या वर अज्ञान ड्रोन घिरट्या घालत होते आणि अशा परिस्थितीत सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत रात्री ८ वाजेच्या जवळपास गोळीबार केला. राष्ट्राध्यक्ष निकोलन मादुरोला यांना पदावरुन काढून टाकल्यानंतर डेप्युटी डेल्सी रोड्रिंग्ज यांनी अंतरिम राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली, त्याच्या काही तासात हा सर्व प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. ट्रेसर फायरच्या मदतीने त्या अज्ञात ड्रोनला व्हेनेडुएलाच्या सैन्याला मारहाण्याचा प्रयत्न केला जात आहे. द कार्डिगनच्या रिपोर्टनुसार, हंटरब्रुक मीडियाच्या एका ओपन सोर्स इनवेस्टिगेटरने सांगितलं की, गोळीबाराची घटना राष्ट्रपती परिसराच्या उत्तरेकडे झाली आहे.  

नक्की वाचा - US Strikes Venezuela अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला का केला? राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना का पकडलं? 5 मोठी कारणं

न्युयॉर्कच्या कोर्टात मादुरो यांना केलं सादर...

अमेरिकेने ज्या प्रकारे व्हेनेझुएलाविरोधात कारवाई केली आणि राष्ट्राध्यक्ष निकोलन मादुरो यांना अटक करीत न्यूयॉर्कला आणण्यात आले, या संपूर्ण घटनेने जगाला हादरवून टाकलं आहे. निकोलन मादुरो यांना सोमवारी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयात हजर करण्यात आलं. मादुरो यांच्यावर ड्रग्स तस्करीशी संबंधित दहशत (नार्को-टेररिज्म) पसरवण्याचा गंभीर आरोप आहे. मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिओ फ्लोरेस यांना कडक सुरक्षेत न्यायालयात आणण्यात आलं. दोघांना हेलिकॉप्टरने मॅनहॅटनमध्ये आणण्यात आलं. यानंतर मोठी पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयात नेण्यात आलं. सुनावणीदरम्यान मादुरो आणि फ्लोरेस यांनी आरोपाचं खंडन केलं आणि आपण निर्दोष असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे मादुरो यांनी ठामपणे सांगितलं की, ते अद्यापही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article