अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनाही बांधता आलेला नाही.
अमेरिकेच्या निवडणुकीत अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया, विस्कॉन्सिन राज्य निर्णायक ठरतात. आज मतदान झाल्यानंतर पुढील काही दिवसात याचा निकाल समोर येईल.
जॉर्जिया
जॉर्जियामध्ये २०२० मध्ये जो बायडेन यांच्या यशाने १९९२ नंतर पहिल्यांदा या राज्यात डेमोक्रेटिक पक्षाला विजय मिळवून दिला होता. राज्यात १० मिलियनहून वाढत जाणारी लोकसंख्या पाहता कमला हॅरिसला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. कमला हॅरिस यांनी विशेषत: अल्पसंख्यांक मतदारांना आकर्षित केलं आहे. कमला या मिशिगन आणि विस्कॉन्सिन सारख्या मुख्यत: गोरे असणाऱ्या राज्यात जोरात प्रचार करीत होत्या, तरीही येथील अधिकतर मतदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला आहेत. हा मोठा बदल जॉर्जियामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
मिशिगन
मिशिगनमधून १५ इलेक्टोरल मतांची मोजणी होते. हे राज्य पारंपरिक डेमोक्रेटिकचा गड राहिला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ च्या विजयाने सर्वकाही बदललं. २०२४ बद्दल सांगायचं झालं तर मिशिगनमध्ये विविधता पाहता यंदा कमला हॅरिस यांना वाढ मिळू शकते. जेव्हा राज्यातील अरब-अमेरिकी लोकांबद्दल बोललं जातं, त्यावेळी बायडेन प्रशासनाने ज्या पद्धतीने गाझामधील युद्ध हँडल केलं, त्यावर नागरिक नाराज आहेत.
नक्की वाचा - US Elections 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल कधी येणार? 270 मतांचं गणित काय?
पेनसिल्वेनिया
हे राज्य एकेकाळी डेमोक्रेटिक पक्षाचा गड होता. आता हा युद्धक्षेत्र बनला आहे. यात १९ इलेक्टोरल कॉलेज वोट आहेत आणि दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. राज्याचा कायापालट त्याच्या आर्थिक आव्हानांमध्ये आहे असं म्हटलं जातं. विशेषत: फिलाडेल्फिया आणि पिटरबर्गसारख्या रस्ट बेल्ट शहरांमधील औद्योगित उत्पदानांची घसरण एक चिंतेचा विषय आहे. ट्रम्प आणि हॅरिस दोघांनी पायाभूत सुविधा आणि उत्पादन सारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली.
अॅरिझोना
२०२० च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत अॅरिझोनामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. येथून बायडेनला केवळ १०,४५७ मतांनी विजय मिळवला होता. आता ट्रम्प यांच्याकडून राज्याला पुन्हा रिपब्लिकन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथे इमीग्रेशन नीतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अॅरिझोनाच्या सीमा या मॅक्सिकोशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे इमिग्रेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एका सर्वेक्षणानुसार, येथे ट्रम्प यांनी ३ टक्क्यांहून जास्त लीड मिळाली आहे.
विस्कॉन्सिन
विस्कॉन्सिन जिंकता येईल याबद्दल ट्रम्प यांना विश्वास आहे. रिपब्लिकन पक्षाने उन्हाळ्यात तेथे राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन केलं होतं. सुरुवातील ट्रम्प यांनी बायडेनविरोधात पुढे गेले होते, मात्र कमला हॅरिस यांनी हे अंतर कमी केलं आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे कोणते?
डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रचाराचे मुद्दे...
समानता, बंधुता
मुलभूत स्वातंत्र्य
घटनात्मक मूल्य, महिलांचे हक्क
गर्भपाताचा कायदा
गाझा पट्टीतील संघर्षविराम
रिपब्लिकन पक्षाच्या प्रचाराचे मुद्दे...
अमेरिकेची अर्थव्यवस्था
बेकायदा स्थलांतरित
बायडेन प्रशासनाची धोरणे
जगभरातील हिंदूंचं रक्षण