जाहिरात

US Elections 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल कधी येणार? 270 मतांचं गणित काय?

US election result date: अमेरिकेत कशी होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक? कधी होणार सुरू होणार मतदान? एग्झिट पोलचे कल कधी येणार? 

US Elections 2024 : अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल कधी येणार? 270 मतांचं गणित काय?
नवी दिल्ली:

अमेरिकेत ५ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होईल. ही राष्ट्राध्यक्षपदाची ६० वी निवडणूक आहे. या निवडणुकीतून अमेरिकन नागरिक राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांची निवड करतात. दोघांचाही कार्यकाळ चार वर्षांचा असतो. यंदा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी जेडी वेन्स मैदानात आहेत. तर डेमोक्रेटिक पक्षाकडून विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष आणि टिम वॉल्ज उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. यासोबत काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

अमेरिकेत कशी होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक? कधी होणार सुरू होणार (us election result date) मतदान? एग्झिट पोलचे कल कधी येणार? 

अमेरिकेत कधी होणार निवडणूक?
यंदा ५ नोव्हेंबर २०२४ (मंगळवार) अमेरित राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. भारत आणि अमेरिकेच्या वेळेत फरक आहे. तोपर्यंत आपल्याकडे ६  नोव्हेंबरचा दिवस उजाडेल. तेथे सरकारचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. जो जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. २० जानेवारीला नव्या राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी पार पडेल. २० जानेवारीला महिन्यातील पहिला रविवार आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ २१ जानेवारीपासून सुरू होईल. 

India-Canada row : कॅनडाच्या मंत्र्यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, भारतानं केली कारवाई

नक्की वाचा - India-Canada row : कॅनडाच्या मंत्र्यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, भारतानं केली कारवाई


अमेरिकेत मंगळवारीच का मतदान होतं?
अमेरिकेत दर चार वर्षांनंतरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या मंगळवारी मतदान होतं. जर नोव्हेंबरच्या सुरुवातील पहिला दिवस मंगळवार असला तरीही या दिवशी निवडणूक होत नाही. अमेरिकेत १८४५ मध्ये सर्व राज्यांमध्ये एकत्रित निवडणुका करण्याचा कायदा झाला होता. त्याकाळात अधिकतर लोक शेती करीत होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांकडे वेळ नसतो. त्यामुळे मतदानासाठी नोव्हेंबर महिना ठरविला जातो. त्याशिवाय रविवारी अधिकतर लोक चर्चमध्ये प्रार्थना करायला जात होते. त्यामुळे मतदानासाठी रविवारचा दिवस रद्द करण्यात आल्या. 

याशिवाय पोलिंग बुथपर्यंत जाण्यासाठी अनेकांना मोठा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे सोमवारचा दिवस योग्य मानला गेला नाही. गुरुवारी आणि शुक्रवारी धार्मिक कारणांमुळे शक्य झालं नाही. त्यामुळे मंगळवारचा दिवस मतदानासाठी नक्की करण्यात आला. 

अमेरिकेत एकूण किती पक्ष आहेत?
अमेरिकेत तसे अनेक पक्ष आहेत. मात्र अधिकतर लोक डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षाला ओळखतात. हे दोन्ही जुने पक्ष आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत या पक्षांचा प्रभाव असतो. याशिवाय ग्रीन पक्ष, लिबर्टेरियन पक्ष आणि कॉन्स्टिट्यूशन पक्ष केवळ नावादाखल निवडणूक लढवतात. 

मतदान करण्याची योग्यता किती?
अमेरिकेत १८ वर्षे आणि त्यावरील लोकांना मतदानाचा अधिकार आहे. नॉर्थ डकोटा सोडून सर्व राज्यांमध्ये लोकांना मतदानापूर्वी स्वत:ला रजिस्टर करावं लागलं. सर्व राज्यांना आपआपली वोटर रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि डेडलाइन आहे. 

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, भारतीय अमेरिकन मतदारांचं कोणाला समर्थन? 

नक्की वाचा - अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, भारतीय अमेरिकन मतदारांचं कोणाला समर्थन? 

मतदानाची वेळ काय?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत मतदान होतं. भारताच्या वेळेनुसार, निकाल ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत पाहता येऊ शकेल. 

एग्झिट पोलचे निकाल कधी येणार?
अमेरिकन निवडणुकीचे एग्झिट पोल भारतीय वेळेनुसार, ६ आणि ७ नोव्हेंबरला मध्यरात्री २.३० नंतर सुरू होईल. 

निकाल कधी येणार?
मतदानानंतर मतांची मोजणी सुरू होईल. मतमोजणी पूर्ण होईल, त्यानंतर अमेरिकेतील न्यूज चॅनल्स विविध राज्यांचे निकाल सांगतात. मात्र सर्व राज्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. अंतिम निर्णयासाठी अनेक दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. मतमोजणी किती जलद गतीने होते किंवा काही कायदेशीर आव्हानं उभे राहतील यावर निकाल अवलंबून असतो. 

अमेरिकन निवडणुकीची प्रक्रिया कशी असते?
अमेरिकेच्या संविधान अनुच्छेद २ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडीची व्यवस्था आहे. निवडणुकीची प्रक्रिया प्रायमरीसह निवडणुकीच्या वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारीपासून सुरू होते आणि जूनपर्यंत चालते. यादरम्यान पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जारी करतात. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेतील ५० राज्यांमधील वोटर पार्टी प्रतिनिधीची निवड होते. प्राथमिक टप्प्यात निवडलेल्या पक्षाचे प्रतिनिधी दुसऱ्या टप्प्यात पक्षाच्या कन्वेंशनमध्ये भाग घेतात. कन्वेंशनमध्ये हे प्रतिनिधी पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड करतात. यादरम्यान नामांकनाची प्रक्रिया पार पडते. तिसऱ्या टप्प्याची सुरुवात निवडणूक प्रचारापासून होते. यामध्ये विविध पक्षाचे उमेदवार मतदारांकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान उमेदवारांमध्ये टेलिव्हिजनवर विविध मुद्द्यांवर वादविवाद होतो. यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या प्रक्रियेत इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान करता. मात्र यापूर्वी राज्यांचे मतदार इलेक्टर निवडले जातात. जे राष्ट्राध्यक्षपदाच्या कोणत्या ना कोणत्या उमेदवारांचे समर्थक असतात. 

निवडणुकीनंतर विजेत्याची निवड कशी होते?
इलेक्टर एक इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. ज्यात एकूण ५३८ सदस्य असतात. इलेक्टर निवडीसह सर्वसामान्य जनतेसाठी निवडणूक संपुष्टात येते. शेवटी इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य मतदानाच्या माध्यमातून अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवड करतात. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी कमीत कमी २७० इलेक्टोरल मतं आवश्यक असतात. अमेरिकेत विनर टेक्स ऑल म्हणजेच पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्याच्या सर्व जागा मिळतात, असा नियम आहे. त्यामुळे २०१६ च्या निवडणुकीत हिलेरी क्लिंटर यांच्यापेक्षा २८.६ लाख कमी मतं मिळूनही डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com