Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर चीनची झोप का उडाली आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins
ट्रम्प यांच्या विजयाचं चीनला टेन्शन का? (फाईल फोटो)
मुंबई:

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  (US President Election 2024) डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक देशांची झोप उडली आहे. त्यामध्ये चीनचाही समावेश असू शकतो. ट्रम्प यांचा विजय चीनसाठी (China On Trump)  त्रासदायक असल्याचं मानलं जात आहे. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर चीनची झोप उडण्याचे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये चीनी मालच्या आयातीवर 60 टक्के कर लावण्यासाोबतच ट्रम्प यांनी केलीली घोषणा तसंच त्यांचं  वुहान व्हायरसबाबतचं वक्तव्य देखील आहे. जे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.  

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनकडून अमेरिकन सरकारला असलेल्या धोक्याबाबतचा  इशारा दिला होता. त्यापूर्वीच्या ओबामा सरकारपेक्षा त्यांचं धोरण वेगळं होतं. आता ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत. त्यामुळे ते चार वर्षांपूर्वीचं धोरण पुढं नेणार का? याकडं जगाचं लक्ष लागलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ट्रम्प यांच्या विजयाचं चीनला का टेन्शन?

  • अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु होऊ नये याची चिंता जिनपिंग यांना सतावत आहेत.
  • ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात चीनमधून येणाऱ्या साहित्यावर मोठा टॅक्स लावण्याची घोषणा केली होती.
  • ट्रम्प यांनी चीनी मालावर 60 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. त्याचा परिणाम चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या मालावर होऊ शकतो
  • ट्रम्प यांनी चीनला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' चा दर्जा समाप्त करण्याचा प्रस्तावही दिला होता.
  • चीनकडून अमेरिकेला दरवर्षी 400 अब्ज डॉलर समानाची विक्री होते. 
  • ट्रम्प यांनी अमेरिकेला जुनं वैभव मिळवून देण्याची घोषणा केली आहे.
  • ट्रम्प स्पलाय चेन आणि टेक कंपन्यांना परत बोलावतील, अशी भीती चीनला सतावत आहे. त्याचा चीनला आर्थिक फटका बसू शकतो.


'कोरोना' काळात चीनला केलं होतं लक्ष

ट्रम्प सत्तेवर येताच त्यांचं 'वुहान व्हायरस' वालं वक्तव्याची पुन्हा एकदा सर्वांना आठवण झाली आहे. कोरोना काळात चीनला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ट्रम्प यांनी कोरोना महामारीचा ठपका चीनवर ठेवला होता. त्यांनी या व्हायरसचं नाव चायनीज व्हायरस असं ठेवलं. कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतून बाहेर आला. या महामारीमुळे झालेल्या मृत्यूच्या नुकसान भरपाईसाठी चीननं अमेरिकेसह जगभरातील देशांना 10 ट्रि्लियन नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक? 6 गोष्टी ठरल्या निर्णायक )

चीनला सतावतीय भीती

चीनच्या आर्थिक विकासाचा दर सध्या मंदावलाय. अर्थजगतामध्ये चैतन्य आणण्यासाठी चीन सरकारनं मोठं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यानंतर गुंतवणूकदार चीनकडं परतू लागले होते. पण, ट्रम्प यांच्या विजयानंतर हे गुंतवणूकदार भारताकडं वळतील, अशी शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे याची झलक दिसलीय.
 

Topics mentioned in this article