US Election Result 2024 : डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस; कोण जिंकणे भारतासाठी फायदेशीर

US Elections 2024: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, या निवडणुकीचे निकाल काहीही आले तरी आमचे संबंध चांगले राहतील.

जाहिरात
Read Time: 3 mins

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आतापर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कमला हॅरिस यांच्या पुढे आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भारताची नजर आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, या निवडणुकीचे निकाल काहीही आले तरी आमचे संबंध चांगले राहतील. डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर त्याचा भारतावर याचा काय परिणाम होईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

  1. अर्थव्यवस्थेला चालना : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले तर भारतालाही त्याचा फायदा होईल. तज्ज्ञांच्या मते भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला ट्रम्प यांच्या विजयाचा फायदा होऊ शकतो. कारण भारताची अर्थव्यवस्था देशांतर्गत वापरावर अवलंबून आहे. याशिवाय वस्तूंच्या कमी किमती, सप्लाय चेनमधील बदल आणि परराष्ट्र संबंध यांचाही भारताला फायदा होण्याची शक्यता आहे.
  2. आयटी कंपन्यांना होईल फायदा : व्यापाराच्या दृष्टिकोनातून, डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यास, भारतीय मध्यम आयटी कंपन्यांसाठी नवीन मार्ग उघडू शकतात, विशेषतः जर ट्रम्प यांनी व्यापाराच्या बाबतीत चीनचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा संपवला. ट्रम्प यांनी अनेकवेळा पंतप्रधान मोदींचे जाहीरपणे कौतुक केले आहे आणि त्यांना आपला चांगला मित्र म्हटले आहे. दुसरीकडे, 2020 च्या अमेरिकन निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी 'अबकी बार ट्रम्प सरकार' असा नारा दिला होता. मात्र ती निवडणूक ट्रम्प हरले होते. मात्र ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री भारतासाठीही फायदेशीर ठरु शकते. 
  3. रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकतं : आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत वारंवार सांगितले आहे की, मी निवडणूक जिंकलो तर युद्ध थांबवणार. तसं झालं तर भारतालाही याचा फायदा होईल. युद्ध जगाला परवडणारी नाहीत असं पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच अनेक मंचांवर सांगितले आहे. म्हणजेच ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा पाठिंबा मिळाल्यास भारताची स्थिती अधिक मजबूत होईल. 
  4. भारताच्या अंतर्गत मुद्द्यावरील हस्तक्षेप कमी होईल : ट्रम्प यांच्या सरकारच्या काळात भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर अमेरिकेचा हस्तक्षेप कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. जो बायडेन यांच्या कार्यकाळात या गोष्टी वाढल्या होत्या.  ट्रम्प याच्या सरकारमध्ये असे घडण्याची शक्यता फारच कमी दिसते.

(नक्की वाचा - Kamala Harris vs Donald Trump : प्रचाराचे मुद्दे कोणते? निर्णायक ठरणाऱ्या 5 राज्यांमध्ये कोण मारणार बाजी?) 


कमला हॅरिस निवडून आल्या तर काय? 

  1. काश्मीरबाबत भूमिका स्पष्ट नाही : कमला हॅरिस यांची काश्मीरबाबतची भूमिका स्पष्ट नाही. ऑगस्ट 2019 मध्ये, जेव्हा भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले, तेव्हा हॅरिस यांनी त्याविरोधात विधान केले होते. 

  2. इमिग्रेशन बाबतचा नरम दृष्टिकोन : कमला हॅरिसचे राष्ट्राध्यक्ष होणे भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. कारण त्यांचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार टिम वॉल्झ यांचे चीनशी संबंध चांगले आहेत. मात्र कमला हॅरिस यांचा इमिग्रेशन बाबतचा नरम दृष्टिकोन भारतासाठी फायदेशीर ठरु शकतो. कमला हॅरिस H-1B सारख्या कुशल कामगार व्हिसा वाढवण्याच्या बाजूने आहेत. याचा फायदा भारताच्या आयटी क्षेत्राला होईल. 
  3. रिन्यूएबल एनर्जीला प्रोत्साहन : हॅरिस अपारंपरिक उर्जेच्या म्हणजेच रिन्यूएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहेत, ज्यासाठी भारताने एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य देखील ठेवले आहे. भारताला आशा आहे की या दिशेने अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळू शकेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, कमला हॅरिस यांच्या विजयामुळे भारतीय बाजा

रपेठेत व्यापक स्थिरता कायम राहण्याची अपेक्षा आहे.