US Iran War: इराणचा अमेरिकेला गणिती सूत्राद्वारे इशारा; f(f(O))>f(O) याचा अर्थ काय?

US-Iran Conflict 2026: इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालीबाफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुज नाकेबंदीच्या निर्णयाची थट्टा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांना 'नाकेबंदी' करण्याचा इशारा दिल्यानंतर, इराणचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालीबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून अमेरिकेला डिवचले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील जनताच इंधनाच्या दराखाली भरडली जाईल, असे संकेत गालीबाफ यांनी दिले आहेत.

गालीबाफ यांचा 'X' वरील इशारा

गालीबाफ यांनी व्हाईट हाऊसजवळील पेट्रोल पंपाचे फोटो शेअर करत लिहिले, "सध्याच्या पेट्रोलच्या दरांचा आनंद घ्या. तथाकथित 'नाकेबंदी'नंतर, तुम्हाला 4-5 डॉलर गॅसचे (पेट्रोल) दिवस स्वप्न वाटू लागतील." 

Advertisement

सर्वात चर्चेची बाब म्हणजे त्यांनी पोस्ट केलेले एक गणिती सूत्र: ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O)

(नक्की वाचा-  Iran-US War: जगाला दुहेही धक्का! इराणनंतर आता अमेरिकेकडूनही होर्मुजवर नाकेबंदी; युद्ध पुन्हा भडकणार?

सूत्राचा अर्थ काय? 

तज्ज्ञांच्या मते, या सूत्राचा अर्थ असा आहे की जर होर्मुज नाकेबंदीची तीव्रता वाढली ($\Delta O_{BSOH} > 0$) तर तेलाच्या किमतीत केवळ साधी वाढ होणार नाही, तर ती चक्रवाढ पद्धतीने प्रचंड वाढेल. पहिला धक्का किमती वाढवेल आणि त्या धक्क्याची प्रतिक्रिया म्हणून किमती पुन्हा दुप्पट वाढतील.

ट्रम्प यांची नाकेबंदी आणि अमेरिकन लष्कराची तयारी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानमधील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकन नौदल आता होर्मुजच्या सामुद्रधुनीतून इराणकडे जाणारी सर्व जहाजे रोखणार आहे. ही नाकेबंदी आज, सोमवारी इराणच्या वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. यूएस सेंट्रल कमांडने (म्हटले आहे की, इराणच्या बंदरांमध्ये जाणारी किंवा तिथून येणारी कोणत्याही देशाची जहाजे पक्षपातरहित पद्धतीने रोखली जातील.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...

भारतावर काय परिणाम?

इराण आणि अमेरिकेतील वादामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. जर इंधनाचे दर गालीबाफ यांनी म्हटल्याप्रमाणे वाढले, तर भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वधारण्याची भीती आहे. तसेच, खाडी देशांत अडकलेल्या भारतीय नाविकांची सुरक्षा हा देखील कळीचा मुद्दा बनला आहे.


Topics mentioned in this article