अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस अधिकतर महत्त्वपूर्ण राज्यात भारतीय अमेरिकन समाजातील वाढत्या समर्थनाची अपेक्षा करीत आहेत. उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्याच्या स्पर्धेत भारतीय अमेरिकन लोकांसाठी मोठी संधी आहे.
अमेरिकन निवडणुकीबाबत काय म्हणतायेत भारतीय अमेरिकन नागरिक?
जॉर्जियातील भारतीय अमेरिकन असोसिएशनचे महासचिव डॉ. वासुदेव पटेल म्हणाले की, भारतीय वंशाची एक नेता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे, ही अभिमानाची बाब आहे. सात प्रमुख राज्यांपैकी जॉर्जिया एक राज्य आहे. त्यामुळे भारतातील अमेरिकन समुदाय हॅरिस यांच्या बाजून निवडणूक वळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते. दिल्लीत शिक्षण झालेले मॅरीलँड येथील मोंटगोमरी काऊंटीचे निवासी सौरभ गुप्ता यांनी सांगितलं की, गेल्या वेळी त्याने ट्रम्प यांना मत दिलं होतं. मात्र यंदा त्यांचं मत कमला हॅरिस यांना जाईल.
हॅरिस निवडणूक जिंकल्या तर विश्वविक्रम होईल...
हॅरिस यांनी ही निवडणूक जिंकली तर अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणतही महिला आणि त्यातही भारतीय वंशाची महिला जगातील सर्वात शक्तिशाली मानला जाणाऱ्या अमेरिकेच्या शीर्षपदावर येईल. ऑगस्टमध्ये हॅरिस यांना राष्ट्रपतीपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार घोषित केल्यानंतर विविध भारतीय अमेरिकन आणि दक्षिण आशियाई अमेरिकी समूह त्यांच्यासाठी निवडणूक प्रचार आदींसाठी पैसे जमा करण्यासह समर्थनासाठी प्रयत्न करीत आहे.
अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार किती?
अमेरिकेत साधारणपणे ५२ लाख भारतीय अमेरिकन निवासी आहेत आणि त्यात तब्बल 23 लाख मतदार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडर दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यापासून मागे हटण्यापूर्वी संशोधन संघटना एएपीआयद्वारे केलेल्या 2024 च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत तब्बल 55 टक्के भारतीय अमेरिकन मतदार डेमोक्रेटच्या समर्थनार्थ आहे. तर 26 टक्के मतदार रिपब्लिक पक्षात आहे.
सर्वेक्षणात 61 टक्के भारतीयांचं हॅरिस यांना समर्थन
कार्नेगी एंडोमेंटद्वारे या महिन्यात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतीय अमेरिकन समुदायात नोंदणीकृत मतदारांपैकी 61 टक्के लोक हॅरिस यांना मत देण्याचा प्लान करीत आहेत. तर 32 टक्के मतदार ट्रम्प यांना मत देण्याचा प्लान करीत आहेत. याशिवाय भारतीय अमेरिकन समुदायाच्या 67 टक्के महिलांना हॅरिसला मत देण्याची इच्छा आहे. तर 53 टक्के पुरुष त्यांना मत देऊ इच्छितात. यात दिल्यानुसार, भारतीय अमेरिकन समुदायाच्या 22 टक्के महिला ट्रम्पला मत देण्याचा प्लान करीत आहेत. तर 39 टक्के पुरुष त्यांच्यासाठी मतदान करणार आहेत.