Venezuela 7.5 Earthquake, Japan 6.9 Earthquake: जगातील दोन देशांमध्ये आलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. व्हेनेझुएलामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप आले. येथे भूकंपामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे निवासी इमारतींपासून ते विमानतळापर्यंत सर्व काही कोसळले आहे. संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये लोक घाबरून घराबाहेर पळाले. येथील एक 22 मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक आपल्या नातेवाईकांची नावे घेऊन हाक मारत आहेत. व्हेनेझुएलामध्ये मागील 100 वर्षांहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे.
जपानमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के
दुसरीकडे जपानमध्येही गुरुवारी (24 जून) 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला. याचे धक्के शेकडो किलोमीटर दूर टोकियोपर्यंत जाणवले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही आणि त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आलेला नाही.
Photo Credit: AP PTI
(नक्की वाचा: School Teacher: शिक्षिकेचे विद्यार्थ्याशी संबंध, VIDEO हाती लागताच मुलांनी ब्लॅकमेल करून मागितली एकच गोष्ट)
परिस्थिती चिंताजनक
काराकासमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारतींमध्ये कंप जाणवू लागल्याने लोक घाबरून बाहेर आले आणि बराच वेळ मोकळ्या जागेत थांबले. इमारतींच्या भिंती कोसळल्यानंतर राजधानीच्या दोन भागात धुळीचे लोट उठतानाही दिसले. या भागांमध्ये कायम वर्दळ पाहायला मिळते. गृहमंत्री दियोस्दादो काबेलो यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के अनेक राज्यांमध्ये जाणवले असतील. काराकासच्या अल्टामिरा भागात घरे आणि इमारती कोसळल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली असून अनेक लोक जखमी झाल्याची भीती आहे. काबेलो यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत मुलं-वृद्धांची विशेष काळजी घेण्यात सांगितले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहा आणि कोणाचेही नुकसान होणार नाही याची खात्री करा, असेही ते म्हणाले आहेत.