- मिलान-कॉर्टिना 2026 विंटर ऑलिम्पिक एथलीट्स व्हिलेजमध्ये १०,००० कंडोम तीन दिवसांत संपले आहेत
- आयोजकांनी सांगितले की, कंडोम पुरवठा अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे
- ऑलिम्पिकमध्ये लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित वर्तणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विनामूल्य कंडोमचा साठा दिला जातो
इटलीमध्ये सुरू असलेल्या मिलान-कॉर्टिना 2026 विंटर ऑलिम्पिकमधून (Milan-Cortina 2026 Winter Olympics) एक आगळीवेगळी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'एथलीट्स व्हिलेज'मध्ये खेळाडूंना विनामूल्य वाटण्यात आलेला 10,000 कंडोमचा साठा अवघ्या 3 दिवसांत संपला आहे. इटलीचे वृत्तपत्र 'ला स्टँपा' (La Stampa) ने याबाबतचा दावा केला असून, सोशल मीडियावर या विषयावर विविध चर्चांना उधाण आले आहे. आयोजकांच्या मते, खेळाडूंना कंडोम उपलब्ध करून देणे ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यामुळेच कंडोमचा पुरवठा केला गेल्याचे त्यांना सांगितले आहे. त्यात काही गैर नाही असं स्पष्टीकरण ही त्यांनी यावेळी दिलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये जगभरातून हजारो तरुण खेळाडू एकत्र येतात. अनेक आठवडे एकाच ठिकाणी राहतात. अशा वेळी त्यांच्या लैंगिक आरोग्याची (Sexual Health) काळजी घेणे आणि सुरक्षित वर्तणुकीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असतो असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. लैंगिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा साठा पुरवला जातो. पॅरिस 2024 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सुमारे 3,00,000 कंडोमचे वाटप करण्यात आले होते. मिलानमध्ये गरज भासल्यास अतिरिक्त साठा तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. ही नियमित बाब असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Viral Video: व्हिडीओत दिसणारी ही खासदार कोण आहे ? दोघांमध्ये नेमकी काय बातचीत झाली ?
ऑलिम्पिक हे केवळ खेळांचे मैदान नसून विविध संस्कृतींच्या मिलनाचे ठिकाण आहे. हजारो खेळाडू दीर्घकाळ एकत्र राहत असल्याने एचआयव्ही (HIV) आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळेच आयोजकांकडून विनामूल्य कंडोम पुरवले जातात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 लाख कंडोमचे वाटप झाले होते. त्या तुलनेत इटलीमध्ये सध्या मागणी जास्त असल्याचे दिसत आहे. आयोजकांनी सांगितले की, साठा संपला तरी काळजी करण्याचे कारण नाही, कारण आणखी कंडोम मागवण्यात आले आहेत. याची चर्चा सोशल मीडियावर जोरात होत आहे.
🇮🇹|•|At the Milan-Cortina 2026 Winter Olympics, the initial supply of approximately 10,000 free condoms in the athletes' villages was depleted within three days, according to reports from La Stampa and other outlets.
— WashingtonAmerica.Net (@WADailyNews) February 13, 2026
Organizers have confirmed additional supplies will be… pic.twitter.com/NLi5BvDdin
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world