Viral Video: 10 रुपयांची पाण्याची बाटली लंडनमध्ये किती रुपयांना ? किमत ऐकून हैराण व्हाल, तर गाजराची किमत..

चलनातील फरकामुळे पाश्चात्य देशांतील वस्तू भारतीयांसाठी कशा आवाक्याबाहेर आहेत, यावर या व्हिडिओने भाष्य केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लंडनमध्ये पाण्याची बाटली भारतीय रुपयांत सुमारे एकशेचाळीस रुपये असून ती भारताच्या तुलनेत अत्यंत महाग आहे
  • भारतीय महिला हातात शंभर रुपये घेऊन लंडनच्या सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करते
  • १०० रुपयांत लंडनमध्ये फक्त ७५ रुपयांच्या गाजराच्या पाकीटाची खरेदी शक्य होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

परदेशात राहाणं, तिथली लाईफ स्टाईल जगण, डॉलर आणि पाऊंडमध्ये कमावणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. परदेशात गेलं की लाईफ सेट असंच सर्वांना वाटतं. हे जरी खरं असलं तरी तिथलं रहाणीमान आणि खर्च पाहीला तर तुम्ही ही डोक्यावर हात मारून घेतल्या शिवाय राहाणार नाही. अनेक जण अमेरिका किंवा इंग्लडमध्ये करिअर करण्याचं पाहातात. पण ज्यावेळी ते तिथं जातात त्यानंतर तिथलं वास्तव सर्वां समोर येतं. सध्या सोशल मीडियावर एका भारतीय महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने लंडनमधील महागाईचे वास्तव मांडले आहे. हे वास्तव पाहील्यानंतर तुम्ही म्हणाल आपला भारतच बरा. तिने तिथे पाण्या पासून फळापर्यंतच्या वस्तू किती रूपयांना मिळतात हे एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. 

भारतात 10 ते 20 रुपयांना मिळणाऱ्या वस्तू लंडनमध्ये किती महाग आहेत, हे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे, ज्या पाण्याची बाटली आपण भारतात 10-15 रुपयांत विकत घेतो, तिची किंमत लंडनमध्ये चक्क 143 रुपये असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. म्हणजे लंडनमध्ये ती पाण्याची बाटली एक ते दिड पाऊंडला मिळते. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत 143 रूपये होते. हा व्हिडिओ 'veggiwander' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही महिला हातात 100 रुपये घेऊन लंडनच्या सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी जाते. 

Advertisement

नक्की वाचा - Alcohol Effects: उन्हाळ्यात दारू पिताना काय काळजी घ्याल? 'या' चुका टाळा नाही तर होईल मोठा घात

सध्याच्या विनिमय दरानुसार 1 पाउंडची किंमत जवळपास 125 रुपये आहे. म्हणजेच ती महिला 0.79 पाउंड घेऊन बाजारात गेली होती. तिला वाटले होते की या पैशात एखादे सँडविच किंवा ब्रेडचे पाकीट सहज मिळेल. पण तिथे गेल्यावर चित्र पूर्णपणे वेगळे होते. व्हिडिओमध्ये ती महिला वेगवेगळ्या वस्तूंचे दर दाखवते. चीज आणि अनियन सँडविचची किंमत 187 रुपये, एक कोबी 110 रुपये आणि बिस्किटाचा पुडा तब्बल 205 रुपयांना मिळत होता. संपूर्ण मार्केट फिरल्यानंतर तिला 100 रुपयांच्या बजेटमध्ये फक्त 75 रुपयांचे (0.60 पाउंड) गाजराचे छोटे पाकीट मिळाले. 

नक्की वाचा - तारे जमीन पर मधील 'ईशान' आता कसा दिसतो? 19 वर्षांनंतरचा लूक पाहून चाहते झाले थक्क, पाहा फोटो

या व्हिडिओला आतापर्यंत 44 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. भारतीयांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. "भारतात 100 रुपयांत पोटभर जेवण मिळतं, तिथे साधी पाण्याची बाटलीही मिळत नाही," असे एका युजरने म्हटले आहे. लंडनमधील जीवनशैली आणि तिथल्या महागाईचा वेध घेणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रुपया आणि पाउंडमधील दरातील तफावत सामान्यांना कशी महागात पडते, याचे जिवंत उदाहरण एका भारतीय महिलेने सोशल मीडियाद्वारे मांडले आहे. अवघ्या 100 रुपयांत लंडनच्या बाजारात काय खरेदी करता येईल, याचा प्रयत्न फसला असून, तिथे साधी पाण्याची बाटलीही 143 रुपयांना विकली जात असल्याचे समोर आले आहे. चलनातील फरकामुळे पाश्चात्य देशांतील वस्तू भारतीयांसाठी कशा आवाक्याबाहेर आहेत, यावर या व्हिडिओने भाष्य केले आहे.

Advertisement