बापरे! या ज्वालामुखीतून बाहेर येतंय लाखोंचं सोनं, कुठे आहे ठिकाण?

Mount Erebus: न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, अंटार्क्टिकामधील माउंट एरेबसमध्ये येथे जवळपास 138 सक्रिय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखीतून विविध प्रकारचे वायू उत्सर्जित होतात. यातून दररोज सोने देखील बाहेर येत असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊया मागील कारण...

जाहिरात
Read Time: 2 mins
Mount Erebus: या ज्वालामुखीतून 5 लाख रुपयांचे सोने येतंय बाहेर

Mount Erebus: ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाबाबतची माहिती आपण अनेकदा वाचली असेलच. पण सोने बाहेर फेकणारा ज्वालामुखी तुम्हाला माहिती आहे का? हो, या ज्वालामुखीतून चक्क लाखो रुपये किंमतीचे सोने बाहेर येत आहे. अंटार्क्टिकामध्ये एक असा ज्वालामुखी आहे, ज्याची कहाणी अगदी एखाद्या सिनेमाच्या कथानकासारखीच आहे. या ज्वालामुखीतून दररोज सुमारे 80 ग्रॅम सोन्याचे धूलिकण बाहेर फेकले जात आहेत.

ही माहिती वाचल्यानंतर बऱ्याच जणांना असे वाटत असेल की या परिसरात राहणाऱ्या लोकांची चांदीच-चांदी असेल किंवा आपणही येथे जाऊन लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे धूलिकण गोळा करूया. पण मंडळींनो! तुम्हाला वाटत आहे, तितकी ही गोष्ट मुळीच सोपी नाही. कारण ज्वालामुखीतून सोन्याचे धूलिकण बाहेर फेकले जाते, ते ठिकाणी कित्येक हजार फूट उंचीवर आहे. या सक्रिय ज्वालामुखीचे नाव माउंट एरेबस (Mount Erebus) असे आहे. अलिकडेच नासाने या ज्वालामुखीसंदर्भातील ही आश्चर्यकारक माहिती शेअर केली आहे. 

दररोज उत्सर्जित होते 80 ग्रॅम सोने 

अंटार्क्टिकामधील माउंट एरेबस (Mount Erebus) येथे सुमारे 138 सक्रिय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखीतून विविध प्रकारचे वायू उत्सर्जित होतात. यामध्येच दररोज 80 ग्रॅम सोन्याचे धूलिकण देखील बाहेर फेकले जातात. सोन्याच्या या धूलिकणांची किंमत सहा हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 5 लाख रुपये इतकी आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, माउंट एरेबसवरील (Mount Erebus) ज्वालामुखी दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उत्सर्जित करतात, यामध्ये सोन्याच्या धूलिकणांचाही समावेश आहे. 

इतक्या उंचावर आहे हे ठिकाण

सोन्याचे धूलिकण उत्सर्जित करणारा हा ज्वालामुखी जवळपास 12 हजार 448 फूट उंच ठिकाणावर आहे आणि सोन्याचे हे धूलिकण ज्या ठिकाणी पडतात, ती जागा सुमारे 621 मैल दूर अंतरावर आहे. नासाच्या (NASA) माहितीनुसार, हा ज्वालामुखी अगदी काठावर असल्याने वितळलेले खडक सहजरित्या बाहेरील बाजूस फेकले जातात. शिवाय यातून वायू व वाफ देखील मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होते. कधीकधी खडकांचे तुकडे देखील बाहेर फेकले जातात.  वर्ष 1972 पासून या ज्वालामुखीतून वारंवार उद्रेक होत आहे, असे Lamont Doherty Earth Observatory या रीसर्च सेंटरचे संशोधक Conor Bacon यांनी सांगितले. 

Advertisement

VIDEO: सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाने पास केली UPSCची परीक्षा

आणखी वाचा

इंडिगो फ्लाइटच्या उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरच्या Vlogमुळे नवा वाद

ट्रकने बाइकला नेले फरफटत, लटकलेल्या अवस्थेतील बाइकस्वाराचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा

नया है यह! बाजारात आली सोन्याचांदीची पाणीपुरी, व्हिडीओ पाहून भडकले युजर्स

Topics mentioned in this article