डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडणारा कोण? ओळख समोर येताच सर्वच जण हादरले, मास्टर प्लॅन ही उघड

या घटनेनंतर वॉशिंग्टनमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात गोळीबार
  • संशयित कोल थॉमस ॲलनने सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न करत शॉटगन, हँडगन आणि अनेक चाकू सोबत ठेवले होते
  • ॲलन कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Washington Hotel Firing News: वॉशिंग्टन येथे आयोजित 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाला.  गोळीबार करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 31 वर्षीय कोल थॉमस ॲलन असे या संशयिताचे नाव आहे. तो कॅलिफोर्नियातील टोरन्स येथील रहिवासी आहे. या घटनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर कोल थॉमस अॅलन हा कोण आहे याची चर्चा सुरू झाली. त्याची जी माहिती समोर येत आहे ती पाहाता सर्वच जण हादरून गेले आहेत.  

वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलबाहेर ही घटना घडली. हॉलमध्ये जवळपास 2,500 पाहुणे उपस्थित असताना ॲलनने सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे शॉटगन, हँडगन आणि अनेक चाकू आढळून आले. त्याने सुरक्षा चौकी ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता 'सिक्रेट सर्व्हिस'च्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटला गोळी लागली. मात्र तो सुरक्षित आहे.

Advertisement

नक्की वाचा - VIDEO: धाड, धाड... डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, सुरक्षा रक्षकांनी वाचवले; जगात खळबळ

कोल ॲलनची पार्श्वभूमी अत्यंत उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे. त्याने 'कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (Caltech) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्याने संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे,2014 मध्ये त्याने नासाच्या 'जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी'मध्ये फेलो म्हणून काम केले होते. तो एक स्वतंत्र गेम डेव्हलपर आणि अर्धवेळ शिक्षक म्हणूनही कार्यरत होता. त्याचा हा बायोडेटा समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा अमेरिकेत रंगल्या आहेत. त्याने हा हल्ला का केला त्याचा उद्देश काय होता अशी विचारणा ही होत आहे. 

नक्की वाचा - Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक

अमेरिकेच्या ॲटर्नी जीनिन पिरो यांनी सांगितले की, ॲलनवर हिंसक गुन्ह्यासाठी शस्त्राचा वापर आणि फेडरल ऑफिसरवर हल्ला केल्याचे गुन्हे दाखल केले जातील. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्लेखोराचे वर्णन 'एक आजारी व्यक्ती' असे केले असून सुरक्षा रक्षकांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. वॉशिंग्टनच्या महापौर म्युरिएल बाऊझर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हा हल्ला एकट्यानेच केला असावा. या घटनेनंतर वॉशिंग्टनमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.