- ट्रंप ने भारत पर 25% टैरिफ लगाने का ऐलान किया है, जिससे कई वस्तुओं का निर्यात प्रभावित होगा.
- भारत से अमेरिका को सबसे ज्यादा स्मार्टफोन, फार्मा उत्पाद, टेक्सटाइल, रत्न आभूषण और ऑटो पार्ट्स जाते हैं.
- भारत का अमेरिका से द्विपक्षीय व्यापार पिछले साल 129 बिलियन डॉलर से अधिक हो गया था.
US India Trade Deal: अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून वस्तू खरेदी केल्याचीही अमेरिकेने शिक्षा देण्याचे ठरवले असून टॅरीफ व्यतिरिक्त भारतावर अमेरिकेने दंडही लावण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून हे टॅरिफ लागू होणार आहेत असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
यामुळे भारतातील कोणकोणत्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या भारतातील कोणत्या टॉप पाच प्रोडक्टवर अमेरिकेच्या निर्णयाचा फटका बसू शकतो, ते पाहूया.
स्मार्टफोन
भारताकडून अमेरिकेला ज्या वस्तू सर्वाधिक निर्यात केल्या जातात, त्यात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनची संख्या सर्वाधिक आहे. अॅप्पलचे स्मार्टफोन आता भारतात असेंबल होत आहे. भारताने अमेरिकेला आयफोन निर्यातीच्या बाबतीत चीनला मागे सोडलं आहे. 2025 या वर्षात भारताने अमेरिकेला 24.1 बिलियन डॉलरचे स्मार्टफोन निर्यात केले होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी जास्त आहे. ट्रम्पच्या 25 टक्के टेरिफ हल्ल्यामुळे या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
औषध उत्पादने
भारताकडून अमेरिकेला निर्यात केला जाणारा दुसरा सर्वात मोठा माल म्हणजे औषध उत्पादने. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून जेनेरिक औषधे आणि इतर संबंधित उत्पादनांची अमेरिकेची निर्यात सुमारे 10 अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या एकूण औषध निर्यातीच्या सुमारे 31-35 टक्के आहे. जर औषध कंपन्यांना टेरिफ वाढीतून सूट मिळाली नाही तर अमेरिकेत भारतीय औषधं आणि अन्य उत्पादनांची कमतरता असल्याने किंमत वाढू शकते.
नक्की वाचा - US India Tarrif: रशियाकडून खरेदी केल्याची भारताला शिक्षा, 25 टक्के टॅरीफसह दंड वसूल करणार
टेक्सटाइल्स
भारताने 2025 या आर्थिक वर्षात अमेरिकेला साधारण 10.8 बिलियन डॉलरचे अपॅरल निर्यात केले होते. भारताचे एकूण टेक्सटाइल निर्यातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर याचं प्रमाण 28 टक्के इतकं आहे. भारत या बाबतीत अमेरिकेवर खूप अवलंबून आहे. अमेरिका सध्या भारतीय कापडांवर 10 ते 12 टक्के कर लादते. आता 25 टक्के अतिरिक्त कर हा भारतीय कापड व्यापाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
रत्न आणि आभूषण...
आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 12 अब्ज डॉलर्स किमतीचे रत्ने आणि दागिने निर्यात केले, ज्यामध्ये अमेरिकेचा वाटा सुमारे 30 टक्के होता. या वस्तूंवर आधीच 27 टक्के टॅरिफ आहे. अशात अतिरिक्त 25 टक्के टेरिफ लावल्याने व्यापारात नफा खूपच कमी होऊ शकतो.
ऑटो पार्ट्स...
भारताने २०२४ मध्ये अमेरिकेला साधारण २.२ बिलियन डॉलरचे ऑटो पार्ट्स आणि कंपोनेट्स निर्यात केले होते. तयार वाहनांचा निर्यात दहा मिलियन डॉलरचा आहे.परंतु पार्ट्सची निर्यात जास्त आहे. ट्रम्प यांनी २५ टक्के शुल्काची घोषणा केल्याने या क्षेत्रातील निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारताच्या अभियांत्रिकी वस्तू क्षेत्रावरही होऊ शकतो, जो भारत सरकारच्या मेक इन इंडिया निर्यात उपक्रमाचा एक प्रमुख भाग आहे.