
नॉर्थ कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासोबतच त्यांची बहीण किम यो जोंग देखील खूप शक्तिशाली आणि धोकादायक मानली जाते. त्यांना 'जगातील सर्वात धोकादायक महिला' हे टोपणनाव मिळाले आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला स्पष्ट शब्दांत उत्तरे दिले आहे. विशेष म्हणजे तिने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच इशारा दिला आहे. त्यावरून किम यो जोंग हीची ताकद किती आहे हे लक्षात येते. शिवाय तिला जगातील सर्वात खतरनाक महिला का म्हणतात हे ही तिनं दाखवून दिलं.
दक्षिण कोरियाला दिले स्पष्ट उत्तर
किम यो जोंग यांनी सोमवारी दक्षिण कोरियाच्या नव्या अध्यक्षांनी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, नॉर्थ कोरियाला दक्षिण कोरियाशी चर्चा करण्यात कोणतीही स्वारस्य नाही. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनी जूनमध्ये पदभार स्वीकारल्यापासून नॉर्थ कोरियाशी संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली होती. पण किम यो जोंग यांनी दोन्ही देशांचे संबंध सामान्य होतील अशी अपेक्षा ठेवू नये असे स्पष्ट पणे म्हटले होते.
नक्की वाचा - Nimisha Priya Case: निमिषा प्रियाची फाशी कशी टळली? लवकरच भारतात परतण्याची शक्यता
ट्रम्प यांनाही दिले प्रत्युत्तर
दक्षिण कोरियाला नकार दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी किम यो जोंग यांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र निरस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना नाकारले होते. त्यांनी सुचवले की, जर अमेरिकेने आपल्या अणुक्षमतेचा काही भाग नॉर्थ कोरियाला बक्षीस दिला, तरच ते चर्चेला तयार होतील. अमेरिकेने त्यांची अण्वस्त्र आम्हाला बक्षिस द्यावीत अशी थेट मागणीच त्यांनी केली. ट्रम्प यांनी नुकतेच किम जोंग उन यांच्यासोबतच्या त्यांच्या वैयक्तिक संबंधांचे कौतुक केले होते. शिवाय दोन्ही देशाचे संबंधं सुधारतील असंही ते म्हणाले होते.
नॉर्थ कोरियाच्या सरकारी माध्यमांतून आलेल्या निवेदनात, किम यो जोंग यांनी कबूल केले की त्यांचे बंधू आणि ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंध "वाईट नाहीत". परंतु त्यांनी स्पष्ट केले की, जर हे वैयक्तिक संबंध नॉर्थ कोरियाच्या अण्वस्त्र निरस्त्रीकरणाच्या उद्देशासाठी असतील, तर नॉर्थ कोरियासाठी ही "एक मस्करी" शिवाय काहीच नसेल. अशा शब्दात त्यांनी अमेरिकेची खिल्लीही उडवली होती. शिवाय ट्रम्प यांच्या वक्तव्याची हवाही काढली होती.
( नक्की वाचा: 193 पैकी फक्त 3 देश... परराष्ट्र मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर'बाबत सर्व सांगितलं )
किम जोंग यांची शक्तिशाली बहीण कोण आहे?
किम यो जोंग या केवळ नॉर्थ कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या बहीण नाहीत, तर त्या नॉर्थ कोरियाच्या एक प्रमुख राजकारणी देखील आहेत. त्या माजी सर्वोच्च नेते किम जोंग द्वितीय आणि त्यांची पत्नी को योंग हुई यांची सर्वात लहान कन्या आहेत. अमेरिकन आणि दक्षिण कोरियन नोंदीनुसार, त्यांचे वय 37 वर्षे आहे. किम यो जोंग सत्ताधारी पक्षातील एक वरिष्ठ अधिकारी असून, त्यांना त्यांच्या भावाच्या प्रवक्त्या म्हणून पाहिले जाते. अनेकदा त्यांना त्यांच्या भावाच्या संभाव्य वारसदार म्हणूनही पाहिले जाते. दक्षिण कोरियन विद्वान सुंग-यूं ली यांच्या 2023 च्या चरित्रग्रंथात त्यांना "जगातील सर्वात धोकादायक महिला" असे संबोधले गेले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world